Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रChandrapur Loksabha 2024: चंद्रपुरात प्रतिभा धानोरकरांच्या नावावर शिक्कामोर्तब; वडेट्टीवारांचा पत्ता कट

Chandrapur Loksabha 2024: चंद्रपुरात प्रतिभा धानोरकरांच्या नावावर शिक्कामोर्तब; वडेट्टीवारांचा पत्ता कट

Subscribe

चंद्रपूर: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झालं आहे. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. मागच्या अनेक दिवसांपासून बहुप्रतीक्षित असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून अनेक नावांची चढाओढ लागली होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपल्या मुलीसाठी त्या जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते, त्यांचे प्रयत्न कमी पडल्याचेच दिसून येत आहे. (Chandrapur Loksabha 2024 Pratibha Dhanorkar s name sealed in Chandrapur Vijay Wadettiwar address cut)

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार सुरू झालेला असताना दुसरीकडे मात्र काँग्रेस उमेदवाराची घोषणा होत नव्हती. वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात उमेदवारीवरून मोठा संघर्ष सुरू होता. पक्षांतर्गत संघर्षाने टोक गाठलेलं असताना रविवारी रात्री अधिकृतपणे धानोरकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता वडेट्टीवार बापलेकीला त्यांच्या प्रचाराल जावं लागणार आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Politics: काँग्रेसला धक्का; आमदार राजू पारवेंचा शिंदे गटात प्रवेश, रामटेकची जागा लढवणार)

ओबीसींचा मुद्दा गाजणार

या मतदार संघात देशपातळीवरील मुद्यांबरोबरच राज्यातील राजकारण आणि स्थानिक मुद्दे चर्चेला येतील. मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनानंतर चंद्रपुरात 21 दिवस अन्नत्याग आंदोलन झाले. ओबीसी संघटना सक्रिय असल्याने समाजाचे प्रश्न अधिक प्रकर्षाने मांडले जातील. ताडोब्यातील पर्यटन समृद्धीची उदाहरणं सांगताना मानव-वन्यजीव संघर्षात जीव गमावणाऱ्यांचे काय, हा प्रश्न अधिक प्रकर्षाने विचारला जाईल.

- Advertisement -

तसंच, उद्योगवाढीमुळे प्रदूषण, इराईममधील अतिरिक्त भार, शहारला एक दिवसाआड पाणीपुरवठा, कापूस आणि सोयाबीनचे कोसळलेले दर, धानाचा रखडलेला बोनस, पर्यटनस्थळांच्या विकासाकडे होणारे दुर्लक्ष हे मुद्देही जोडीला असतील. खुद्द राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उमेदवार असल्याने त्यांच्या योजनांतील उणिवांवर बोट ठेवलं जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -