घरमहाराष्ट्रताडोबा व्याघ्र प्रकल्प 11 जानेवारीपासून पर्यटकांसाठी बंद

ताडोबा व्याघ्र प्रकल्प 11 जानेवारीपासून पर्यटकांसाठी बंद

Subscribe

दरम्यान ख्रिसमस आणि न्यू ईअरनिमित्त ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी गर्दी केली होती. पंधरा दिवसांत बुकिंग हाऊसफुल्ल झाल्याने १६ हजारांच्या आसपास पर्यटकांनी या प्रकल्पाला भेट दिल्याचे दिसून आले, त्यामुळे दोन वर्षानंतर का होईना पर्यटनाला सुगीचे दिवस आले होते. मात्र ओमिक्रॉन व्हेरिएंटने पुन्हा एकदा पर्यटनावर आधारित लोकांचा रोजगार हिरावून घेतला आहे.

राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या एन्ट्रीमुळे रुग्णसंख्या पुन्हा झपाट्य़ाने वाढतेय. याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून कोरोनासंबंधीत निर्बंध कडक केले जात आहे. या निर्बंधांची नवी सुधारित नियमावली राज्य सरकारने 11 जानेवारी २०२१ रोजी जाहीर केली, याअंतर्गत आता राज्यातील उद्याने, पार्क, पर्यटनासाठी काही निर्बंध ठरवून दिले आहे. त्या निर्बंधांनुसार चंद्रपूरमधील जगप्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सफारी पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. मंगळवारपासून म्हणजे 11 जानेवारीपासून हे निर्बंध अंमलात आणले जाणार आहे. मात्र सोमवारी ताडोबा पर्यटनासाठी बुकिंग केलेल्या पर्यटकांना सफारी करता येणार असल्याचे प्रकल्प व्यवस्थापनाने जाहीर केले आहे.

ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्पातील पर्यटनासाठी 11 जानेवारी 2022 नंतर केलेल्या आगाऊ बुकिंगची संपूर्ण रक्कम 10 दिवसांत www.mytadoba.org वरून संबंधित बुकिंग खात्याच्या ई वॉलेटमध्ये जमा केली जाईल. ही ई वॉलेटमधील रक्कम ३० जून २०२३ पर्यंत वैध असेल.

- Advertisement -

कोरोनाचे सर्व नियम पाळत जून २०२१ पासून ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प निसर्ग पर्यटनासाठी सुरु करण्यात आला. मात्र 2022 या नव वर्षापासून कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने मागील चार दिवसांपासून नियम आणखी कडक करण्यात आले. यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटाकांचे लसीकरण पूर्ण होऊन १४ दिवस पूर्ण झाल्यानंतरचं प्रवेश दिला जात होता.

- Advertisement -

मात्र राज्यात १० जानेवारीपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला. तसेच शाळा, महाविद्यालये, मॉल, मैदाने, उद्यान, पार्क पूर्णपणे बंद करण्याचे आदेश लागू करण्यात आले. त्यामुळे पर्यटनस्थळे देखील बंद होणार आहेत. या अंतर्गत आता ताडोबा व्याघ्रप्रकल्पातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

दरम्यान ख्रिसमस आणि न्यू ईअरनिमित्त ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी गर्दी केली होती. पंधरा दिवसांत बुकिंग हाऊसफुल्ल झाल्याने १६ हजारांच्या आसपास पर्यटकांनी या प्रकल्पाला भेट दिल्याचे दिसून आले, त्यामुळे दोन वर्षानंतर का होईना पर्यटनाला सुगीचे दिवस आले होते. मात्र ओमिक्रॉन व्हेरिएंटने पुन्हा एकदा पर्यटनावर आधारित लोकांचा रोजगार हिरावून घेतला आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -