Homeमहाराष्ट्रChandrashekhar Bawankule : कालपर्यंत ईव्हीएमला दोष देणारे..., मविआतील वादावर बावनकुळेंचे टीकास्त्र

Chandrashekhar Bawankule : कालपर्यंत ईव्हीएमला दोष देणारे…, मविआतील वादावर बावनकुळेंचे टीकास्त्र

Subscribe

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शुक्रवारी (ता. 10 जानेवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधल. यावेळी त्यांना विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानाबाबत विचारणा करण्यात आली. ज्यावर त्यांनी टीका केली.

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर आता निवडणुकीच्या दोन महिन्यानंतर महाविकास आघाडीचे नेते याचे खापर एकमेकांवर फोडू लागले आहेत. काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी तर मविआतील मुख्यमंत्रिपदाच्या वादावरून अन् जागावाटपाच्या घोळावरून मविआला पराभवाचा सामना करावा लागल्याचे म्हटले आहे. तर मविआला जागावाटपाच्या घोळामुळे फटका बसल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडूनही सांगण्यात आले. तर त्यांच्या या विधानावर आणि मविआतील वादावर महसूल मंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. (Chandrasekhar Bawankule criticism of the ongoing internal dispute in Mahavikas Aghadi)

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शुक्रवारी (ता. 10 जानेवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधल. यावेळी त्यांना विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानाबाबत विचारणा करण्यात आली. ज्याबाबत हसत उत्तर देत बावनकुळे म्हणाले की, बरं झालं वडेट्टीवारांनीच जागा वाटपाच्या घोळामुळे त्यांचा पराभव झाल्याचे मान्य केले. कालपर्यंत ते ईव्हीएमला दोष देत होते. आता ते वस्तुस्थितीबाबत बोलू लागले आहेत. त्यांनी आता अभ्यास केलेला दिसत आहे. पण अजूनही त्यांना थोड्याफार अभ्यासाची आणखी गरज आहे. त्यांनी अभ्यास करून काय चुकले याचे आकलन जर का केले तर त्यांची गाडी पटरीवर येऊ शकते, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Sanjay Raut : वाद पेटला! वडेट्टीवारांची ‘ती’ शंका अन् काँग्रेसनं जागावाटपात कसा घोळ घातला राऊतांनी थेटच सांगितलं

जसे लोकसभेच्या निवडणुकीत आमचाही अपघात झाला. तेव्हा आम्ही काही चुका केल्या होत्या. त्या चुका आम्ही दुरुस्त केल्या. आम्ही जनतेपर्यंत गेलो. तेव्हा घर चलोसारखे उपक्रम राबवले. जनतेला विश्वासात घेतले. जनतेला सांगितले की, डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला विकासापर्यंत नेऊ शकते. त्यामुळे जनतेने आमचे म्हणणे ऐकत महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी केले. पण महाविकास आघाडीने गोंधळाचे वातावरण तयार केले, ज्यामुळे त्यांना त्यावेळी मतदान मिळाले. पण त्यानंतर मात्र, आम्ही जनतेला सर्व पटवून दिल्याने जनता आमच्या बाजूने आली. पण त्यामुळे मात्र मविआचा पराभव झाला आणि आता मविआ आपापसातील वादामुळे पेटली आहे. त्यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाही. पण त्यांनी आता वस्तुस्थितीवर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे, जे चांगले आहे, असे यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -