घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंची परिस्थिती 'हम दो हमारे दो' अशी बिकट होणार; बावनकुळेंची जहरी...

उद्धव ठाकरेंची परिस्थिती ‘हम दो हमारे दो’ अशी बिकट होणार; बावनकुळेंची जहरी टीका

Subscribe

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्हा गोठवल्याने आता ठाकरे गट आणि शिंदे गटाला अंधेरी पोटनिनवडणुकीत पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही. आयोगाच्या निर्णयानंतर आता दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत. यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिवसेना पक्षप्रमुखांमुळेच शिवसेनेची आज ही परिस्थिती झाली आहे. यात उद्धव ठाकरेंची परिस्थिती ‘हम दो हमारे दो’ अशी होणार असल्याची जहरी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शिवसेनेचे जे 12 खासदार आणि 40 आमदार बाहेर पडले त्यांना माहीत आहे की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मतं मागून निवडून आले आहेत. जे उद्धव ठाकरे गटात आमदार-खासदार आहेत, त्यांनाही ही गोष्ट माहीत आहे की, आम्ही मोदींच्या विश्वासावर आम्ही निवडून आलो आहोत आणि त्यांच्याकडे जे बाकी आहेत, त्यांनाही हे माहीत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून आता जाणीवपूर्वक गेलेल्या आमदार, खासदारांना परत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही शिवसेनेसाठी आलेली मोठी त्सुनामी होती जी शिवसेनेला पूर्णपणे उध्वस्त करून गेली आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंचा हेकेखोरपणा, हट्टीपणा, विश्वासघात, विचारांविरुद्ध कुठेही जाऊन युती करणे, हे सत्य आहे की, मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी आणि परिवारातील सदस्यांना पदं मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण शिवसेनेची वाट लावली. महाआघाडीत सामील होणे ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती आणि ती चूक दुरूस्त करणे कठीण आहे. त्यांच्या हातून आता सगळं निसटत चाललं आहे. त्यामुळे शिवसेनेची आज जी परिस्थिती झाली ती केवळ उद्धव ठाकरेंच्या चुकीच्या वागण्यामुळे झाल्याचा आरोप बावनकुळेंनी केला आहे.


सध्याच्या राजकीय घडामोडींवरून राज ठाकरेंचे मनसैनिकांना महत्त्वाचे आवाहन, म्हणाले…


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -