घर महाराष्ट्र सुप्रिया सुळेंचा भाजपवर पक्ष फोडण्याचा आरोप, चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले सडेसोड प्रत्युत्तर

सुप्रिया सुळेंचा भाजपवर पक्ष फोडण्याचा आरोप, चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले सडेसोड प्रत्युत्तर

Subscribe

राष्ट्रवादी पक्ष भाजपमुळे फुटल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आला आहे. परंतु त्यांच्या या आरोपाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे अनेकवेळा प्रयत्न झाले आहेत. काहीवेळा हे प्रयत्न अपयशी ठरेल, तर काहीवेळा यश मिळालं. पक्ष फोडणे, साम-दाम-दंड-भेद हे देवेंद्र फडणवीसांचेच शब्द आहेत. त्यांना काहीही करून सत्तेत यायचं असते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात सध्या विविध चर्चा रंगल्या आहेत. परंतु त्यांच्या या आरोपांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही कुणाचाही पक्ष फोडण्याचे काम केलेले नाही. ते आमचे संस्कार नाहीत, असे म्हणत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. (Chandrasekhar Bawankule reply to Supriya Sule accusation of breaking NCP)

हेही वाचा – Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नाही, अजित पवार आमच्या पक्षाचे…; सुप्रिया सुळेंचे मोठे विधान

- Advertisement -

सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “आम्ही कुणाचाही पक्ष फोडण्याचे काम केलेले नाही. ते आमचे संस्कार नाहीत. असे फोडाफोडीचे संस्कार कुणाचे आहेत? हे देशाला आणि राज्याला माहित आहे. त्यांना त्यांचे संस्कार लखलाभ. इतरांचे पक्ष फोडण्याचे राजकारण ज्यांनी आयुष्यभर केले, आता तेच लोक आमच्यावर बोलत आहेत. सुप्रिया सुळे या आमच्या ताई आहेत, आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे. मात्र स्वातंत्र्यानंतरचा इतिहास जरा पाहा, कुणी पक्ष फोडून सत्ता मिळवली ते समजेल.”

तसेच, एकनाथ शिंदे मर्द मराठा नेते आहेत. त्यांनी हिंदुत्वाची साथ धरली आहे. तर अजित पवार यांनी देशाच्या कल्याणासाठी मोदींना साथ दिली आहे. शरद पवारांचे घर फुटले कारण ते घर सांभाळू शकले नाहीत. आता सुप्रिया सुळे आमच्यावर आरोप करत आहेत. मात्र मला हा विश्वास आहे की आगामी काळात शरद पवार यांचे मन परिवर्तन होईल आणि ते मोदींना पाठिंबा देतील, असा विश्वास यावेळी बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

- Advertisement -

राष्ट्र्वादी पक्ष फोडण्याचा भाजपचा हा पहिलाच प्रयत्न नाही. तर याआधीही त्यांनी तीन वेळा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला. आधीच्या दोन वेळेला त्यांना यश आले नाही. पण तिसऱ्यावेळी त्यांना यश आले. तसंच भाजपाचे 105 आमदार कष्टाने निवडून आले त्यांच्याबाबत मला वाईट वाटते, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला होता.

- Advertisment -