घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Budget Session 2022 : आम्ही पुढची ५ वर्ष मोफत वीज...

Maharashtra Assembly Budget Session 2022 : आम्ही पुढची ५ वर्ष मोफत वीज देऊ, चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन

Subscribe

राज्यात कृषीपंप वीज ग्राहकांची वीज न कापण्याच्या निर्णय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतला. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असेपर्यंत शेतकर्‍यांची वीज कापणार नाही, असा निर्णय ठाकपे सरकारने घ्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. आमचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यास आम्ही ५ वर्ष मोफत वीज देऊ असेही बावनकुळे यांनी सभागृहात सांगितले. अर्थसंकल्पावर आयोजित चर्चत ते बोलत होते.

भाजपचे ५ वर्षे सरकार होते. आम्ही ४५ लाख शेतकऱ्यांना २८ हजार कोटींची वीज मोफत दिली असे बावनकुळे यांनी सांगितले. पण या काळात शेतकऱ्यांची वीज कधीही कापली नाही. शेतकरी हा जीडीपीला हातभार लावणारा आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची वीज मविआने कापू नये अशी मागणी बावनकुळे यांनी केली. राज्यातील शेतकऱ्यांची वीज न कापल्यास राज्याची वित्तीय तूट भरून निघालयाही मदत होईल.

- Advertisement -

आमच्या काळात महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या कंपन्या ४५०० कोटी रुपयांच्या फायद्यात होत्या. पण सध्या कंपन्या अचणीत आल्या आहेत. राज्यात ५ हजार विद्युत सहाय्यकांची भरती प्रक्रिया अद्यापही पूर्ण झाली नसल्याची बाब त्यांनी सभागृहात सांगितली. या भरतीसाठी दीड लाख अर्ज आले होते. पण अद्यापही ही प्रक्रिया अपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा : प्रवीण दरेकरांना सरकारकडून अडकवण्याचा प्रयत्न, चंद्रकांत पाटलांचा आरोप

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -