‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’! चंद्रशेखर बानवकुळेंची विरोधकांवर टोकाची टीका

काल सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आता विरोधकांकडून वेगवेगळ्या टिका-टिप्पणीला सुरूवात झालीय. याला जोरदार प्रत्तूत्तर देताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोकाची टीका केलीय.

Chandrashekhar-Bawankule

Maharashtra budget session 2023 :

Maharashtra budget session 2023 : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक क्षेत्रासाठी आमचा अर्थसंकल्प असल्याचे सांगत नव नव्या योजना जाहीर केल्या. शेतकऱ्यांपासून नोकरदारापर्यंतच्या सगळ्यांसाठी योजना जाहीर करण्यात आल्या. शासकीय नोकरदारांपासून ते खासगी क्षेत्रातील नोकरदारांनाही या अर्थसंकल्पामध्ये काही ना काही योजना असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. या अर्थसंकल्पावर आता विरोधकांकडून वेगवेगळ्या टिका-टिप्पणीला सुरूवात झालीय. याला जोरदार प्रत्तूत्तर देताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोकाची टीका केलीय. देवेंद्र फडणवीस यांनी काल सादर केलेला अर्थसंकल्प पाहून ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’! असं विरोधकांना म्हटलंय.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या नागपूरमध्ये आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना अर्थसंकल्पावर विरोधकांकडून होणाऱ्या टीकांबाबत सवाल केला होता. यावर उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षाच्या त्यांच्या सरकार काळात त्यांनी काही केलं नाही आणि काल देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट अर्थसंकल्पावर फक्त तोंडाच्या वाफा काढण्याचं काम सुरू आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या तरतूदी अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. गेल्या अडीच वर्षाची आणि कालच्या देवेंद्र फडणवीसांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची तुलना करा, हा अर्थसंकल्प पाहून ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’!”

यापुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सामनातून होणाऱ्या टीकेवरही आपलं मत व्यक्त केलंय. जे सामनाचे संपादकीय लिहितात, जे मार्गदर्शक आहेत त्यांनी साधी सरपंचाची निवडणूक तरी लढवली का? असा खोचक सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. तसंच सामना हा फक्त टीका करण्याकरीता आणि टोमण्यांसाठीचा एक मुखवटा आहे, असा आरोप देखील यावेळी बावनकुळे यांनी केलाय.

या अर्थसंकल्पासाठी जरी कर्ज घेतले असतील तर त्यातून जे उत्पन्न मिळणार आहे, त्यावरून हे कर्ज फेडण्याचीही क्षमता आहे, असं देखील यावेळी बावनकुळे म्हणाले. अर्थसंकल्पामुळे विरोधक निराश झाले आहेत. या अर्थसंकल्पातून आपलं दुकान बंद होणार आहे, अशी भीती विरोधकांमध्ये आहे, असं देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

“विदर्भातील क्रीडामंत्री असताना निधी मिळत नव्हता. मविआनं विदर्भाला सपत्न वागणूक दिली. पण या अर्थसंकल्पातून विदर्भाला शिल्लक निधी मिळाला.”, असं देखील यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.