घरताज्या घडामोडी'अरे भास्कर... आता बस कर..', बावनकुळेंवर टीका करताच चित्रा वाघ संतापल्या

‘अरे भास्कर… आता बस कर..’, बावनकुळेंवर टीका करताच चित्रा वाघ संतापल्या

Subscribe

'अरे भास्कर... आता बस कर. तुमच्यासारख्या लोकांनी राजकारणाचा चिखल केलाय..! आमचे मा.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या कामाबद्दल बोलायची तुमच्यात हिंमत नाही तर आता त्यांच्या वर्णावरून बोलायला लागलात', अशा शब्दांत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर दिले.

‘अरे भास्कर… आता बस कर. तुमच्यासारख्या लोकांनी राजकारणाचा चिखल केलाय..! आमचे मा.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या कामाबद्दल बोलायची तुमच्यात हिंमत नाही तर आता त्यांच्या वर्णावरून बोलायला लागलात’, अशा शब्दांत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर दिले. भास्कर जाधव यांनी बावनकुळे यांची तुलना वेस्ट इंडिजच्या खेळाडूशी केली. ‘चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्राचे आहेत, पण दिसतात वेस्ट इंडिजच्या खेळाडूसारखे’, असे भास्कर जाधव म्हणाले होते. भास्कर जाधवांच्या या वक्तव्यालाच चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Chandrashekhar Bawankule BJP Leader Chitra Wagh Slams Thackeray Group leader Bhaskar Jadhav)

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांच्या हल्लाबोल केला आहे. “अरे भास्कर… आता बस कर..! कोण विचारत नाही म्हणून एवढ्या खालच्या दर्जाचं विधान करून लोकांचं लक्ष वेधून घेण्याची तुमची ही तऱ्हा आम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. पण किती खाली पडायचं याला पण काहीतरी लिमिट असू द्या”, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी भास्कर जाधव यांच्यावर संताप व्यक्त केला.

- Advertisement -

“तुमच्यासारख्या लोकांनी राजकारणाचा चिखल केलाय..! आमचे मा.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या कामाबद्दल बोलायची तुमच्यात हिंमत नाही तर आता त्यांच्या वर्णावरून बोलायला लागलात… असे करून तुम्ही फक्त बावनकुळेजी यांचा अपमान करत नाही आहात तर समस्त कृष्णवर्णीयांचा अपमान करताहात..! असो, तुमच्यासारख्या अकार्यक्षम आणि निर्बुद्ध लोकांकडून दुसरी काय अपेक्षा? राजकारणात तुम्ही आलातच आहात स्वतःचे खिसे भरून लोकांना नाव ठेवायला”, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

याशिवाय, “स्वतःच्या शब्दांची जरा जरी लाज असेल तर ताबडतोब माफी मागा! बाकी…देव तुमच्यासारख्यांना सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना…”, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

- Advertisement -

नेमके काय म्हणाले भास्कर जाधव?

“चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्राचे आहेत, पण दिसतात वेस्ट इंडिजच्या खेळाडूसारखे. बावनकुळे पॅट्रिक पॅटरनसारखे दिसतात का तर नाही. ब्रायन लारासारखे दिसतात का तर नाही. मग, ते कोणासारखे दिसतात, तर वेस्ट इंडिजचे खेळाडू अ‍ॅब्रोससारखे दिसतात. जुन्या लोकांना माहिती आहे, अ‍ॅब्रोस कसे दिसत होते”, असे भास्कर जाधव म्हणाले.

“तुम्ही वेस्ट इंडिजच्या खेळाडूसारखे दिसता. पण, ते खेळाडू होते, तुम्ही कोणाबरोबर खेळताय, उद्धव ठाकरेंबरोबर. उद्धव ठाकरे तुम्हाला एका चेंडूत आऊट करतील, पत्ता सुद्धा लागणार नाही”, असेही भास्कर जाधव म्हणाले.


हेही वाचा – “राहुल गांधी उद्योगपतींना भेटण्यासाठी परदेशात जातात; गुलाम नबी यांचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -