Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र उद्धव ठाकरेंबाबतचा आपला निर्णय चुकला, याची पवारांना खंत; बावनकुळेंची टीका

उद्धव ठाकरेंबाबतचा आपला निर्णय चुकला, याची पवारांना खंत; बावनकुळेंची टीका

Subscribe

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शरद पवार यांनी जो प्रयोग केला होता तो फसला आहे. तीन पक्षाचे नेतृत्त्व करत असताना कोणतेही नेतृत्त्व उभं राहिले नाही. याची त्यांना आता खंत वाटत असेल. त्यामुळे या तीन पक्षाची वज्रमूठ सैल झाली आहे. आता कोणत्याही प्रकारचे नेतृत्त्व नाही.

ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पक्षाचा वारसदार तयार करण्यात अपयश आल्यांच मोठं विधान करण्यात आलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाचा नवा अध्यक्ष नेमण्यासाठी जी समिती नेमली त्यात भाजपात जाण्याचं संधान बांधणारे नेते होते, असा गंभीर आणि मोठा दावा ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात याबाबत वक्तव्य करण्यात आलं. यानंतर महाविकास आघाडीतील घटकापक्षांमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या बद्दल सामनात आलेल्या अग्रलेखावर प्रतिक्रिया दिली आहे.( Chandrashekhar Bawankule Criticised Sharad pawar Uddhav Thackeray decision)

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शरद पवार यांनी जो प्रयोग केला होता तो फसला आहे. तीन पक्षाचे नेतृत्त्व करत असताना कोणतेही नेतृत्त्व उभं राहिले नाही. याची त्यांना आता खंत वाटत असेल. त्यामुळे या तीन पक्षाची वज्रमूठ सैल झाली आहे. आता कोणत्याही प्रकारचे नेतृत्त्व नाही. तर विविध पक्षातील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे या मर्द मराठ्यांच्या नेतृत्त्वात एवढे बदल झाले आहेत. पुढे निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे राज्यात वादळ येणं बाकी आहे. कर्नाटकात ते वादळ पाहायला मिळाले आहे. तसेचं, देवेंद्र फडणवीस यांची राज्यामध्ये गारपीट होणे बाकी आहे. त्यानंतर राज्यात होणार बदल लक्षातच येणार नाहीत. कोण कुठे आहे हे कळणार देखील नाही, अशेही बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -

 लातूर दौऱ्यावर असलेल्या बावनकुळे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक पातळीवर मोर्चे बांधणी सुरु आहे. येत्या काळामध्ये संघटनेतील अनेक पदाधिकाऱ्यांच्या फेरनियुक्त्या करण्यात येणार आहेत. काही बदलही करण्यात येणार आहेत.

( हेही वाचा: मोठी बातमी: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा उद्या सर्वोच्च न्यायालयात निकाल )

सर्वोच्च न्यायालयात निर्णय लवकरच

- Advertisement -

सत्तासंघर्षावर निकाल येणार असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, कोर्टामध्ये सरकारचा फैसला लवकरच होणार आहे. यात सरकारला कसलीही अडचण नाही. मात्र, त्यापूर्वीच माध्यमात काही निरेटिव्ह सेट केले जात आहेत. कोर्टाना निर्णय येण्यापूर्वी त्यावर भाष्य करणं हा कोर्टाचा अवमान आहे. अशा संदर्भात भाष्य कोणी करत असतील, तर त्यावर कोर्टाने कडक पावले उचलावीत असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

- Advertisment -