Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र विरोधकांच्या बॉम्बचं बारूदच गायब; बावनकुळेंचा 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांना टोला

विरोधकांच्या बॉम्बचं बारूदच गायब; बावनकुळेंचा ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना टोला

Subscribe

माझ्या लोकसभा प्रचारात लोक मोदी-मोदी असे नारे लावून समर्थन देत आहेत. इंडिया आघाडीच्या बॉम्बच बारुदच गायब आहे, त्यामुळे ते मोदींविरोधात काहीच करू शकत नाहीत, असं म्हणत बावनकुळे यांनी टोला लगावला आहे. 

मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज आणि उद्या ( 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर) ला बैठक आहे. मुळात इंडिया आघाडी ही भाजपप्रणित मोदी सरकारला हरवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे. आता यावर भाजपचे नेते प्रतिक्रिया देत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांची इंडिया आघाडी ही बारुद नसलेला बॉम्ब आहे असं म्हणत टीकास्त्र डागलं आहे. (Chandrashekhar Bawankule Criticized Rahul Gandhi over his statement on Adani and also called INDIA is fake)

गुरुवारी पत्रकारांशी बोलनाना बावनकुळे म्हणाले की, इंडिया आघाडीचे घटक पक्ष मुंबई बैठकीसाठी एकत्र आले आहेत. ही त्यांची नौटंकी असून , ते मुंबईत येतील, हॉटेलमध्ये राहतील, दोन दिवस फिरतील आणि निघून जातील. त्यांच्या या बैठकीत कोणतंही तथ्य नाही. त्यांच्या आघाडीला कुणीही कोणासोबत नाही. आघाडीतील 10-12 पक्ष असे आहेत की, त्यांचे कुठेही मंत्रीदेखील नाहीत. पंतप्रधान मोदींच्या विरोधात महाराष्ट्रत काही करता येईल का? असा प्रश्न विचारला असता बावनुकळे म्हणाले की, असा त्यांचा प्रयत्न आहे, मात्र महाराष्ट्रात भाजपाच्या 45 हून अधिक लोकसभा जागांवर विजय होईल. माझ्या लोकसभा प्रचारात लोक मोदी-मोदी असे नारे लावून समर्थन देत आहेत. इंडिया आघाडीच्या बॉम्बच बारुदच गायब आहे, त्यामुळे ते मोदींविरोधात काहीच करू शकत नाहीत, असं म्हणत बावनकुळे यांनी टोला लगावला आहे.

- Advertisement -

अदानी कंपनीबाबत जी काही चौकशी आहे ते ती ती राज्य करतील, परंतु महाराष्ट्रात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे राहुल गांधी हे इथे येऊन थापा मारण्याचं काम करत आहेत. तसंच, अदानी समूह हा जो देशात मोठा झाला आहे, त्यातला 90 ट्केक काळ हा कॉँग्रेस शासित च्या वेळेचा आहे. अदानी समूह हा काही एका वर्षात मोठा झाला नाही. त्यामुळे अदानीवरून आमच्या पक्षाला किंवा आमच्या नेतृत्त्वाला कोंडीत पकडणं म्हणजे हा फुसका बॉम्ब आहे, असं मला वाटत, असं म्हणत बावनकुळे यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

(हेही वाचाछ एकनाथ शिंदेंचं ठाकरेंना थेट उत्तर; म्हणाले – अनेक चेहरे रावणाला… )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -