घरताज्या घडामोडीराहुल गांधींना स्टंटबाजी करण्याची सवय, मोदींशी मुकाबला शक्य नाही; भाजप नेत्याची टीका

राहुल गांधींना स्टंटबाजी करण्याची सवय, मोदींशी मुकाबला शक्य नाही; भाजप नेत्याची टीका

Subscribe

मागील काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राहुल गांधींनी सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारकडून टीका केली जात आहे. अशातच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींना स्टंटबाजी करण्याची सवय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुकाबला शक्य नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, जेव्हा विकास कामावर बोलता येत नाही तेव्हा संशयास्पद, धुव्रीकरणाचं राजकारण काँग्रेसने केलं. भाजप आले तर मुस्लिमांना पाकिस्तानात जावे लागेल, बाबासाहेबांची घटना बदलून टाकतील, अशी दिशाभूल करून काँग्रेस मतदान करते. आम्ही विकासाचे मुद्दे लोकांसमोर घेऊन जातो. परंतु राहुल गांधीची नरेंद्र मोदींशी तुलना होऊ शकत नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -

काँग्रेसने जे काही पसरवण्याचा प्रयत्न केला त्याला अर्थ नाही. खासदारकी गेल्यावर बंगला सोडावा लागतो. पदावरून गेल्यानंतर बंगला खाली करण्याची नोटीस देण्याची वेळ येऊ नये. मनमोहन सिंग यांनी आणलेले विधेयक राहुल गांधींनीच फाडले होते. नवीन कायद्याने सदस्यपद रद्द झाले का?, खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये, नियम हा सर्वांनाच सारखा आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

राहुल गांधींना कोर्टाने शिक्षा दिली मग वरच्या कोर्टात का गेले नाहीत?, तुम्ही ओबीसी समाजाचा अपमान केला नाही तर वरच्या कोर्टात जायला हवं होतं. कोर्टाच्या निकालावर स्टे मिळवला नाही तर खासदारकी जाईल हे माहिती नव्हते का?, असा सवाल उपस्थित करत ही काँग्रेसची स्टंटबाजी आहे. तुम्हाला हिरो बनायचे होते म्हणून राहुल गांधींनी खासदारकी गमावली, अशी टीका बावनकुळेंनी राहुल गांधींवर केली.

- Advertisement -

हेही वाचा : सर्वकाही आलबेल, चिंता नसावी; सोनिया-राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर राऊत असं का म्हणाले?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -