पवारांना कोणीही मुख्यमंत्री चालेल पण फडणवीस नको, कारण.., बावनकुळेंचा मोठा खुलासा

Chandrashekhar Bawankule

पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यातील गौप्यस्फोट बाहेर येत आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवरून अनेक वक्तव्यं केली आहेत. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील मोठा खुलासा केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शरद पवारांना राज्यात कोणीही मुख्यमंत्री चालेल पण फडणवीस नको. असाच त्यांचा अजेंडा आहे. देवेंद्र फडणवीस यांना विरोध करायचा आणि त्यांनी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवार काही करू शकतात, असा खुलासा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती. पण त्यांना फडणवीस मुख्यमंत्री नको होते. पवारांना माहिती होतं की, फडणवीस मुख्यमंत्री झाले तर काँग्रेस, राष्ट्रवादी भुईसपाट होईल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

शरद पवारांच्या सल्ल्यानेच पहाटेचा शपधविधी झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका कार्यक्रमात केला होता. त्यांच्या या विधानानंतर राज्यभर बरीच खळबळ माजली. शरद पवारांच्या राजकीय भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. परंतु, त्यांनीही देवेंद्र फडणवीसांना खोट्यात पाडण्याकरता प्रत्युत्तर दिले. फडणवीसांनी असत्याचा आधार घेत अशापद्धतीचं वक्तव्य केलं आहे, असं शरद पवार म्हणाले. मात्र, त्यावरही फडणवीसांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हटलं आहे.


हेही वाचा : मी शंभर टक्के सत्यच बोललो, पहाटेच्या शपथविधीच्या वक्तव्यावर फडणवीस ठाम