घरमहाराष्ट्रभाजपमध्ये येण्यासाठी तयार असलेल्यांच स्वागतच...; थोरातांच्या राजीनाम्यानंतर बावनकुळेंचं सूचक विधान

भाजपमध्ये येण्यासाठी तयार असलेल्यांच स्वागतच…; थोरातांच्या राजीनाम्यानंतर बावनकुळेंचं सूचक विधान

Subscribe

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे, यामुळे काँग्रेस पक्षातही आता मोठा भूकंप झाला आहे. नाना पटोलेंवरील नाराजीमुळे बाळासाहेब थोरात यांनी हा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. यानंतर बाळासाहेब थोरात आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या राजकीय चर्चांना उधाणं आल आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठं सुचक विधान केलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी भाजपमध्ये येण्याचा विचार केल्यास त्यांना पक्षात घेणार का? असा प्रश्न बावनकुळे यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला, ज्यावर ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा हा अंतर्गत प्रश्न आहे. पण जर भाजपमध्ये कोणी उद्या येण्यासाठी तयार असेल तर पक्ष सर्वांच स्वागत करतो. कारण आमचा सर्वव्यापी, सर्वस्पर्शी पक्ष आहे, असं सुचक विधान बाळासाहेब थोरातांनी केलं आहे.

काँग्रेस पक्षासाठी गेल्या 40 वर्षांपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांंमध्ये धुसफूस सुरु आहे. त्यामुळे आमच्याकडे जो जो येईल, त्या त्या वेळी कार्यकर्त्याला संधी देऊ, आमच्या पक्षात आल्यानंतर त्यांना चांगली संधी देण्याची जबाबदारी ही आमची असेल, असही बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -

भाजप वाढवण्यासाठी काम करतो

भाजप राजकीय पक्ष आहे, रोज आम्ही पक्ष वाढवण्यासाठी काम करतो, पक्षाच्या माध्यमातून सत्ता मिळवणे आणि सत्ता ही साधन म्हणून वापरणे साध्य नाही हा आमचा मूळ मंत्र आहे. बाळासाहेब थोरात असो किंवा अजून कोणी असो…बाळासाहेब थोरात यांना मी व्यक्तिगत ओळखतो त्यांच्या रक्तारक्तात काँग्रेस आहे. त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधीही तडजोड केली नाही, असही बावनकुळे म्हणाले.

थोरातांसारख्या ज्येष्ठ नेत्याची नाराजी काँग्रेससाठी योग्य नाही

बाळासाहेब थोरात यांनी नऊ नऊ वेळा महाराष्ट्र विधीमंडळात प्रतिनिधीत्व केलं. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम कामं केलं. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष वाढण्यासाठी त्यांनी मोठं काम केलं, सहकार क्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे. त्यामुळे पक्षात काम करताना अशा नेतृत्त्वाला नाराजी येत असेल आत्मचिंतन करावं लागेलं, आत्मचिंतन करण्याची स्वत:ची जबाबदारी आहे. कारण पक्षातील कोणी बाळासाहेब थोरात यांच्यासारखा ज्येष्ठ नेता माझ्यामुळे नाराज होत असेत तर ते योग्य नाही, असही बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -

हा काँग्रेससाठी मोठा आत्मचिंतनाचा विषय

माझ्यामुळे पक्षातील एखाद्या नेत्याचा मनात नाराजी आली तर मी जाऊन बोलेन, समजूत काढेन. राज्याच्या अध्यक्षाची जबाबदारी आहे की पक्षातील कोण नेता नाराज आहे की नाही ते पाहणे. पण राज्याचा अध्यक्ष म्हणून जर माझ्या पक्षात कोणी माझ्यावर नाराज असेल तर मी त्याच्याकडे जाईन आणि बोलेन. पण बाळासाहेब थोरातांसारखा नेता नाराज आहे तर हा काँग्रेससाठी मोठा आत्मचिंतनाचा विषय आहे, असं मतही बावनकुळेंनी व्यक्त केलं.

काँग्रेसचे नेते मुलांना, नातेवाईकांना प्रोजेक्ट करण्याच्या नादात कार्यकर्ता विसरतायत

काँग्रेसमधील बी आणि सी हे छोटे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे. त्यांना काँग्रेसमधील अनेक नेते आपल्या मुलांना, नातेवाईकांना प्रोजेक्ट करण्याच्या नादात कार्यकर्ता विसरुन जात आहे असा, आरोपही बावनकुळेंनी केला आहे.

सत्यजीत तांबेंसाठी भाजपचे दरवाजे उघडे

सत्यजीत तांबे यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चांवर बावनकुळे म्हणाले की, भाजप पक्ष नेतृत्त्वाने निर्णय घेतला की, स्थानिक पातळीवर सत्यजीत तांबे यांना विधान परिषदेसाठी मदत केली पाहिजे. त्यानुसार स्थानिक पातळीवर आमच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी, मंत्री, आमदार खासदार, उत्तर महाराष्ट्रातील टीमने मदत केली आहे. सत्यजीत तांबे यांना आम्ही ऑफर दिली नाही, पण त्यांना वाटत असेल की, त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा, तर भाजप त्यांना केव्हाही, कधीही प्रवेश देईल, आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत.


‘या’ जिल्ह्यातील 40 लाख लाभार्थ्यांना मिळणार धान्याऐवजी पैसे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -