Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र अध्यक्षपदी राहण्यासाठी लागणारी योग्यता बावनकुळेंकडे नाही; भुजबळांचा टोला

अध्यक्षपदी राहण्यासाठी लागणारी योग्यता बावनकुळेंकडे नाही; भुजबळांचा टोला

Subscribe

इतकी क्षमता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तुमच्यात नाही, त्यामुळे इतक्या मोठ्या पहाडासारख्या व्यक्तीवर बोलू नये, असा टोला भुजबळांनी लगावला आहे. 

मागच्या काही दिवसांपासून छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अध्यक्षपदावरुन टीका करत आहेत. या टीकांना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ( Chandrashekhar Bawankule’s do not have the qualifications to be president A troop of Chhagan Bhujbal’ s )

छगन भुजबळ म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेसह क्रिकेटमधील अनेक मोठ्या संस्थांवर सर्वोच्च पदावर काम करण्याची क्षमता पहाडासारख्या शरद पवारांमध्ये आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळेमध्ये अशी क्षमता नसल्याने यावर बोलू नये, असा चिमटा छगन भुजबळ यांनी काढला आहे.

- Advertisement -

कर्नाटक सीमावर्ती मराठी भाग सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरीकडे प्रचार केला असतात तर बरे झाले असते. कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषकांवर अन्याय होत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी सभा घेतल्या, हे योग्य आहे का? या प्रश्नांवर ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेसह अशा अनेक शिक्षण आणि सहकारी संस्था आहेत, ज्यांच्या घटना बदलून शरद पवार हे अध्यक्ष झाले आहेत . ते अध्यक्षपद सोडतील का? असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेसारख्या मोठमोठ्या संस्थांवर प्रमुखपदी जाण्यासाठी तितकी योग्यता लागते. साखर उद्योगात असलेल्या मोठमोठ्या संस्थांवर पवार साहेबांनी काम केले आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागेल, निर्णयाचे स्वागतच असेल; ठाकरे गटाचा विश्वास )

क्रिकेट क्षेत्रातील देशातील असलेली संस्था बीसीसीआय आणि विदेशात असलेल्या जागतिक क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भुषवले आहे. चव्हाण सेंटरच्या माध्यमातून पु.ल. देशापांडे यांच्यासह इतर साहित्यिकांच्या भाषणांचे एकत्रीकरण करत असून असे चौफेर काम करणारे पवार साहेब अद्वितीय आहेत.

मात्र, इतकी क्षमता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तुमच्यात नाही, त्यामुळे इतक्या मोठ्या पहाडासारख्या व्यक्तीवर बोलू नये, असा टोला भुजबळांनी लगावला आहे.

- Advertisment -