घरमहाराष्ट्रChandrashekhar Bawankule: शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीची साथ सोडली पाहिजे;...

Chandrashekhar Bawankule: शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीची साथ सोडली पाहिजे; बावनकुळेंचं वक्तव्य

Subscribe

इंडिया आघाडीत असलेल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना उदयनिधी स्टॅलिन यांचं वक्तव्य मान्य असेल तर त्यांनी सांगितलं पाहिजे. मान्य नसेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीची साथ सोडली पाहिजे.

सनातन धर्माचं मलेरिया, डेंग्यू, करोना किंवा अन्य रोगांप्रमाणे उच्चाटन झालं पाहिजे, असं विधान तामिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून देशभरात गदारोळ माजला होता. यावरून आता भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट वक्तव्य केलं आहे. (Chandrashekhar Bawankule Sharad Pawar and Uddhav Thackeray should quit India Aghadi Chandrashekhar Bawankule s statement)

उदयनिधी स्टॅलिन यांचं वक्तव्य शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मान्य नसेल तर त्यांनी इंडिया आघाडीची साथ सोडली पाहिजे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. ते म्हणाले की, इंडिया आघाडीत असेलेले तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयिनधी स्टॅलिन यांनी हिंदू धर्म संपत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं विधान केलं. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी हे विधान स्वीकारलं आहे. पण इंडिया आघाडीत असलेल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना उदयनिधी स्टॅलिन यांचं वक्तव्य मान्य असेल तर त्यांनी सांगितलं पाहिजे. मान्य नसेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीची साथ सोडली पाहिजे. सत्तेच्या लालसेपोटी हिंदूस्तानातील हिंदू संस्कृती संपवण्याची भाषा करणाऱ्यांबरोबर शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत, असं देखील बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -

भाजपचं मिशन 45

लोकसभा निवडणुकीत 45 पेक्षा अधिक जागा मिळवण्यासाठी महायुतीच्या आघाडीतील पक्षांशी बोलणं सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कालखंडात तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या मागील पाच वर्षांतील व शिंदे यांच्या सव्वा वर्षाच्या कार्यकाळातील लोकाभिमुख कामांची शिदोरी आम्ही जनतेसमोर घेऊन जात आहोत.

संघटनात्मक बांधणी करून लोकसभा निवडणुकीत 51 टक्क्यांपेक्षा अधिक मतं मिळवण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. जागावाटपाचा निर्णय पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाकडून होईल. जागावाटपाबाबत चर्चेतूनच तोडगा काढला जाईल.

- Advertisement -

खासदार श्रीकांत शिंदे भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवतील, या आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यावर त्यांना दिवसा स्वप्न दिसतात, असा टोला बावनकुळे यांनी लगावला. खासदार शिंदे हे प्रभावी आहेत, ते 51 टक्क्यांपेक्षा अधिक मतं घेऊन पुन्हा निवडून येतील, असा दावाही बावनकुळे यांनी यावेळी केला.

(हेही वाचा: डर अच्छा है…, मुख्यमंत्री शिंदे यांचा परदेशदौरा पुढे ढकलल्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -