…पक्षाकरीता फडणवीसांनी एक पाऊल मागे घेतलं, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य

Chandrasekhar Bawankule

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्वागत करण्यात आलं. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं संघटन ९७ हजार ३८६ पर्यंत जे कामं चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात झालं. मला अभिमान आहे की, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रातील सर्व निवडणुका आपण जिंकल्या. तसेच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यामुळे राज्यात सत्तापरिवर्तन झालं. खऱ्या अर्थाने सर्वांना ही अभिमानाची बाब आहे. दरम्यान,पक्षाकरीता फडणवीसांनी एक पाऊल मागे घेतलं, असं मोठं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राचं सर्वोच्च पद सोडून फक्त पक्षाकरीता फडणवीसांना महाराष्ट्राला अभिमान असलेलं खऱ्या अर्थाने आपल्याला नेतृत्व मिळालेलं आहे. पक्षाकरीता त्यांनी एक पाऊल मागे घेतलं. त्यामुळे एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्या समोर उभा आहे.

देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय निवडणूक समितीत सर्वोच्च स्थान मिळालं. त्याबद्दल मी केंद्रीय निवडणूक समितीचे आभार मानतो. त्यांच्या नेतृत्वात देशातील निवडणुका होतीलच पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात आपल्याला एक ताकद मिळाली आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


हेही वाचा : दहीहंडीला रवी राणांचा मेगाप्लॅन, बॉलिवूड सेलिब्रिटीही घेणार सहभाग