Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी नाशिक पदवीधरसाठी भाजपचा तांबेंना की शुभांगी पाटलांना पाठिंबा?; बावनकुळे म्हणाले...

नाशिक पदवीधरसाठी भाजपचा तांबेंना की शुभांगी पाटलांना पाठिंबा?; बावनकुळे म्हणाले…

Subscribe

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघ हा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे. या मतदारसंघात अपक्ष उमेदवारांमध्येच लढाई होणार असून या उमेदवारांना भाजपचा की महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळणार याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

आतापर्यंत आमच्याकडून कोणीही पाठिंबा मागितलेला नाही. नाशिक पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीबाबत बोलायचे झाले, तर या मतदारसंघात अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या शुभांगी पाटील या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांनी एक वर्षापूर्वीच भाजपात प्रवेश केला आहे. धनराज विसपुते हेखील भाजपचे कार्यकर्ते आहेत. परंतु जोपर्यंत पक्षाच्या राज्य आणि केंद्र संसदीय बोर्डाकडून निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणाला पाठिंबा द्यायचा यावर निर्णय होत नाही. ही अपक्षांची लढाई असल्यामुळे आतापर्यंत पाठिंब्यासाठी आमच्याकडे कोणीही आलेले नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -

मूळच्या भाजपच्या असलेल्या शुभांगी पाटील यांनी नाशिक पदवीधरमधून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याची शक्यता असल्याने पाटील यांनी काल शनिवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली.

शिक्षक संघटनेची मी गेली १० वर्षे अध्यक्ष होते. या मतदारसंघातील पदवीधरांसाठी मी लढले आहे. त्यासाठी मी स्वत: आझाद मैदानात आंदोलन केले आहे. म्हणूनच काम करणार्‍या व्यक्तीसाठी संधी मागितली होती, पण मला कोणत्याही पक्षाचा एबी फॉर्म मिळालेला नाही. त्यामुळे मी सध्या तरी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवत आहे. मी पाठिंब्यासाठी सर्वच पक्षांकडे विनंती करीत आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. ठाकरे गटाचे नेते पाठिंब्याबाबत माध्यमांना कळवतील, असे शुभांगी पाटील म्हणाल्या.


- Advertisement -

हेही वाचा : भाजपची ढील तर मविआची घसटी निवडणुकीत मोठा ‘पेच’


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -