घरताज्या घडामोडीनिवडणूक बिनविरोध केल्यास टिळक कुटुंबाला देणार उमेदवारी - चंद्रशेखर बावनकुळे

निवडणूक बिनविरोध केल्यास टिळक कुटुंबाला देणार उमेदवारी – चंद्रशेखर बावनकुळे

Subscribe

भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर कसबा पेठेत पोटनिवडणुक होत आहे. या पोटनिवडणुकीत (By Election) भाजपने टिळक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी नाकारली. यामुळे टिळक कुटुंबियांमध्ये नाराजी असल्याचं दिसून आले आहे.

महाविकास आघाडीने कसबा पेठ पोटनिवडणूक बिनविरोध केल्यास टिळक कुटुंबियांना उमेदवारी देऊ, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. पोटनिवडणुकासाठी उमेदवारी न दिल्याने टिळक कुटुंबीय नाराज असल्याचे समोर आले. त्यानंतर आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेतली. (Chandrashekhar Bawankule will give candidature to Tilak family of the election is unopposed)

भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर कसबा पेठेत पोटनिवडणुक होत आहे. या पोटनिवडणुकीत (By Election) भाजपने टिळक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी नाकारली. यामुळे टिळक कुटुंबियांमध्ये नाराजी असल्याचं दिसून आले आहे. पुण्यातून (Pune) याचे पडसाद दिसायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेतली.

- Advertisement -

या भेटीनंतर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘दुपारी तीन वाजेपर्यंच मविआने निवडणूक बिनविरोध केल्यास रासणेंचा अर्ज मागे घेऊ’, असे सांगितले.

“कसबा पेठ पोटनिवडणूक बिनविरोध केल्यास मी उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार आणि नाना पटोले यांचे आभार मानीन. परंतु, त्यांनी निवडणूक बिनविरोध करण्यास नकार दिला. त्यामुळे आम्हीही निवडणूक लढवणारच आहोत. जर तुम्ही निवडणूक बिनविरोध केली तर, आम्ही टिळक कुटुंबियांना उमेदवारी देण्यास तयार आहोत”, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -

“कसबा पेठ पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी देखील सर्वपक्षियांना फोनवरून विनंती केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीही फोनवरून विनंती केली”, असेही बावनकुळे यांनी सांगितले.


हेही वाचा – शिवसेनेच्या निष्ठावंतांनी पळ काढत घरची पार इज्जत काढली, मग काँग्रेस कशी मागे राहील : डॉ. हेमलता पाटील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -