Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र 'तुमच्यात हिंमत असेल तर संविधान बदलून दाखवा'; काँग्रेसचं भाजपला आव्हान

‘तुमच्यात हिंमत असेल तर संविधान बदलून दाखवा’; काँग्रेसचं भाजपला आव्हान

Subscribe

बाबासाहेबांच्या संविधानाने जनतेला वर्णव्यवस्थेतेतर शोषण ग्रस्त समाजाला न्याय समता बंधुतेचा मार्ग दर्शविला. प्रजेला नागरिक केले. याच संविधानाला बदलण्याचा भाजपचा कुटील डाव आहे. असं म्हणत संविधान वाचवण्याची हाक देत, काँग्रेसनं संविधान बचाव पदयात्रा काढली.

बाबासाहेबांच्या संविधानाने जनतेला वर्णव्यवस्थेतेतर शोषण ग्रस्त समाजाला न्याय समता बंधुतेचा मार्ग दर्शविला. प्रजेला नागरिक केले. याच संविधानाला बदलण्याचा भाजपचा कुटील डाव आहे. असं म्हणत संविधान वाचवण्याची हाक देत, काँग्रेसनं संविधान बचाव पदयात्रा काढली. याचं नेतृत्त्व काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी केलं. यासंदर्भातील माहिती काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करत दिली आहे. सोबतच त्यांनी भाजपला आव्हान देखील केलं आहे. (Change the constitution if you dare Congress challenge to BJP Sachin Sawant Given Challenge to Modi Government)

काय म्हणाले सचिन सावंत?

सचिन सावंत म्हणाले की, आरएसएसच्या संघटनेनं 22 वर्ष तिरंगा फडकवला नाही. तिरंग्याला अशुभ म्हटलं. ही संघटना जेव्हा जेव्हा सत्तेवर येते तेव्हा तेव्हा संविधान बदलाची भाषा करते. अशीच भाषा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी केली होती. अडवाणींनी पत्रदेखील लिहिलं होतं. त्यावेळी एक कमिटीही नेमली गेली होती. परंतु देशपातळीवर ते राबवण्याचं धैर्य हे वाजपेयींचं झालं नाही, असं म्हणत सावंत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

- Advertisement -

सावंत पुढे म्हणाले की, आता पुन्हा एकदा संविधान बदलण्याचा डाव रचला जात आहे. काही लोकांना बोलावून संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसं चित्र तयार केलं जात आहे. त्यामुळे अशा लोकांना आता आम्ही आव्हान देत आहोत. आज हा जो मोर्चा संविधान बचाव म्हणून काढण्यात आलेला आहे. हा केवळ आता मुंबईमधील आहे. परंतु येत्या काळात संपूर्ण देशपातळीवर हा मोर्चा काढला जाईल. त्यामुळे तुमच्यात साहस, धैर्य आणि हिंमत असेल तर तुम्ही संविधान बदलून दाखवा आणि त्यावेळी कळेल की हेडगेवार मोठे की बाबासाहेब, असं म्हणत सचिन सावंत यांनी थेट भाजपला आव्हान दिलं आहे.

- Advertisement -

संविधान बदलाची भाषा भाजपने सुरू केली आहे. ही भाजपच्या आणि आरएसएसच्या मनातील गोष्ट आहे. त्यामुळे पाणी किती गरम आहे, हे पाहण्याचा जर का प्रयत्न असेल तर आता कशाप्रकारे हात पोळतात हे देखील पाहण्याची वेळ भाजपवर येणार असल्याची टीका सावंत यांनी यावेळी केली. तसंच, याचं उत्तर 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता भाजप पक्षाला देईल, असं मतही सावंत यांनी यावेळी व्यक्त केलं.

( हेही वाचा: शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची 2024 च्या निवडणुकीची तयारी; राज्यातील 30 जिल्ह्यांसाठी निवडले प्रभारी )

- Advertisment -