घरमहाराष्ट्रसंभाजी बिडीवर शिवभक्त संतापले! बिडीचे नाव बदलण्याचा कंपनीला अखेरचा इशारा

संभाजी बिडीवर शिवभक्त संतापले! बिडीचे नाव बदलण्याचा कंपनीला अखेरचा इशारा

Subscribe

महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती संभाजी यांच्या नावाने महाराष्ट्रात गेली ८० वर्षांपासून संभाजी बिडी या नावाने धूम्रपान उत्पादन केले जात आहे. मात्र आता बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यामुळे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले होते. कोणत्या न कोणत्या मुद्यांवरून शिवरायांचा अवमान झाल्याच्या घटना समोर आल्यामुळे शिवभक्तांनी वेळोवेळी तीव्र संताप व्यक्त केला जात असून संभाजी बिडीबद्दल शिवभक्तांनी चांगलाच आक्षेप घेतला आहे.

या कारणाकरता केली मागणी

बिडीला संभाजी महाराजांचं नाव देणं आणि त्याची विक्री करणं हा संभाजी महाराजांचा अपमान असल्याने संभाजी बिडीचे नाव आता बदलण्यात यावं, अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनने केली आहे. महाराष्ट्रात गेली ८० वर्षांपासून संभाजी बिडी या नावाने धूम्रपान उत्पादन केले जात आहे. परंतु छत्रपती संभाजी महाराज यांची युद्धनीती, लेखन, संपूर्ण जगाला माहिती आहे. असं असताना जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात त्यांच्या नावाने बिडी उत्पादन होतं असून या बिडीवर महाराजांचे नाव असून त्याची विक्री केली जात आहे. तो कागद फाडून फेकला जातो.

- Advertisement -

त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान होतं आहे, हा अवमान सहन केला जाणार नाही. यासाठी या बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीने नाव बदलून निर्मिती करावे, अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनकडून आता करण्यात येत आहे.

…तर १ सप्टेंबरपासून महाराष्ट्रभर आंदोलन

शिवधर्म फाउंडेशनकडून अशी मागणी करण्यात येत असून जर या संबंधीत कंपनीने नाव जर बदलले नाही तर १ सप्टेंबरपासून महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बिडीचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला देण्यात आला आहे.


‘राहुल गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे’; अशोक चव्हाण यांचे निवेदन
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -