विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात बदल

येत्या २० जून रोजी विधान परिषद निवडणुकीचा संग्राम होणार आहे. त्यामुळे आमदारांना मुंबईमध्येच थांबण्याची तंबी देण्यात आली आहे. राज्यसभेत आमदार फुटल्यामुळे शिवसेनेने आपले उमेदवार आपल्याच बळावर निवडून आणण्याचा प्लॅन आखला आहे.

aditya thackeray

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे १५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यासाठी जय्यत तयारी सुरू झाली असून आता या दौऱ्यादरम्यान काही बदल करण्यात आले आहे. आदित्य ठाकरेंसोबत आता फक्त कार्यकर्तेच जाऊ शकणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात आमदारांना परवानगी नाकारण्यात आली आहे. (Changes in Aditya Thackeray’s visit to Ayodhya for Legislative Council elections)

हेही वाचाआंतरराष्ट्रीय दर्जाच्या रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्रामुळे वरळीचा नावलौकीक सातासमुद्रापार – आदित्य ठाकरे

येत्या २० जून रोजी विधान परिषद निवडणुकीचा संग्राम होणार आहे. त्यामुळे आमदारांना मुंबईमध्येच थांबण्याची तंबी देण्यात आली आहे. राज्यसभेत आमदार फुटल्यामुळे शिवसेनेने आपले उमेदवार आपल्याच बळावर निवडून आणण्याचा प्लॅन आखला आहे.

हेही वाचा – अयोध्येत लहान मुलांना परवानगी आहे का? नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात कार्यकर्ते आणि आमदार अयोध्येला जाणार होते. शिवसेनेचे अनेक नेते या दौऱ्यासाठी निवडण्यात आले होते. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आमदारांचा अयोद्धा दौरा रद्द करण्यात आला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी ठाणे स्थानकातून विशेष एक्स्प्रेस सुटली असून यातून तब्बल १२०० युवासैनिक अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहे. ढोल ताशांच्या गजरात आणि श्री रामाच्या जयघोषात ठाणे स्थानक दुमदुमून गेले होते.
ठाण्यातून १२०० कार्यकर्ते निघाले तर नाशिकहून दीड हजारांहून अधिक कार्यकर्ते अयोध्येसाठी रवाना होणार आहेत. नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.

१५ जून रोजी शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी आदित्य ठाकरे हे रामलल्लाचे दर्शन घेऊन संध्याकाळी ७ वाजता गंगा नदी येथे आरती करणार आहेत.