घरताज्या घडामोडीकरोनामुळे पुण्यातील काही शाळांच्या परिक्षा वेळापत्रकात बदल; तर काही वर्गांना सुट्टी

करोनामुळे पुण्यातील काही शाळांच्या परिक्षा वेळापत्रकात बदल; तर काही वर्गांना सुट्टी

Subscribe

करोना व्हायरसमुळे पुण्यातील काही शाळांच्या परिक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले असून काही वर्गाना बुधवारपासून सुट्टी देण्यात आली आहे.

करोनाची लागण होऊ नये, यासाठी पुणे शहरातील काही शाळांनी आपल्या परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही शाळांनी आजारी विद्यार्थ्यांना परीक्षा असली तरी शाळेत न येण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय शाळेत येताना मास्क घालून यावे, अशाही सुचना शाळांनी विद्यार्थ्यांसह पालकांना दिल्या आहेत. विद्यार्थी व पालकांमध्ये करोनाबाबत जनजागृती केली जात असून आजारी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये, अशा स्पष्ट सुचना इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. त्यातच कात्रज परिसरातील आर्यन शाळेने आपल्या परीक्षा काही दिवस लवकर घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बिशप शाळेने शक्यतो विद्यार्थ्यांनी मास्क घालून शाळेत यावे, अशा सुचना दिल्या गेल्या आहेत. तसेच आजारी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबतही काळजी करून नये, असे लेखी पत्र काढले आहे. दरम्यान, सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी येथील पवार पब्लिक स्कूलने आजारी असल्यास विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये, तर ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, नर्सरी व पहिलीच्या विद्यार्थ्यांनी पुढील सुचना मिळेपर्यंत बुधवारपासून सुट्टी दिल्याचे पालकांना कळविले आहे.

करोना व्हायरसबद्दल शाळेमधील विद्यार्थ्यांसह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण केली जात आहे. प्राथमिक व माध्यमिक वर्गाच्या परीक्षा काही दिवस अगोदर घेतल्या जात आहेत. तसेच परीक्षेनंतर शैक्षणिक वर्षाचा कालावधी संपेपर्यंत शाळा सुरू ठेवली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ दिवस लवकर घेण्याचे निश्चित केले असून काही वर्गाच्या परीक्षा सुरू आहेत.
– मिलिंद लडगे, संचालक, आर्यन स्कूल, कात्रज.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -