घरमहाराष्ट्रबीडमध्ये चार पॉझिटिव्ह रुग्णांविरोधात गुन्हा दाखल

बीडमध्ये चार पॉझिटिव्ह रुग्णांविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

बीडमध्ये एका कुटुंबातील व्यक्तीमुळे बीड शहरातील १२ लोकांना कोरोनाचा संसर्ग

देशभरात कोरोना व्हायरसने कहर केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरात राहण्याचे आवाहन प्रशासन करत आहे. दरम्यान, होम क्वॉरंटाईन असणाऱ्या व्यक्तीने घराबाहेर पडू नये, इतर कोणाच्या संपर्कात येऊ नये असे असताना काही नागरिक या नियमांचे पालन करताना दिसत आहे. याचाच परिणाम बीडमध्ये राहत असलेल्या एका कुटुंबातील व्यक्तीमुळे बीड शहरातील १२ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. घडलेल्या घटनेची चौकशी करत बीडच्या शहर पोलीस ठाण्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह चार रुग्णांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्वॉरंटाईन न राहता घराबाहेर वावर

एबीपी माझाने दिलेल्या माहितीनुसार, बीड शहरातील मसरत भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील व्यक्तीला उपचारासाठी काही दिवसापूर्वी हैदराबादला नेण्यात आले होते. यासाठीची रीतसर परवानगी या कुटुंबाला देण्यात आली होती. मात्र हैदराबादहून परत आल्यानंतर या कुटुंबातील सदस्यांनी होम क्वॉरंटाईन राहणे असे अपेक्षित होते. मात्र घरात न राहता बरेच दिवस या कुंटुबातील व्यक्ती हे घराबाहेर फिरत होते.

- Advertisement -

असा घडला प्रकार

या कुटुंबातील गाडीवरील ड्रायव्हर पॉझिटिव्ह आला, त्यानंतर त्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांच्या कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यानंतर एकाच कुटुंबातील ४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले.
या कुटुंबातील एका सदस्य तर बीड शहरातील जालना रोडवर असलेली इंडिया बँकमध्ये कामासाठी गेला. त्यानंतर कलेक्टर ऑफिस परिसरामध्ये असलेले रजिस्ट्री कार्यालयमध्ये हा व्यक्ती जाऊन आल्याचे लक्षात आले.

पॉझिटिव्ह असतानाही लग्नाला हजेरी

दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने लग्न समारंभांमध्ये देखील हजेरी लावली होती. म्हणून बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये संबंधितांवर गुन्हा दाखल झाला असून यापैकी ४ जण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. पोलिस प्रशासनाच्या वतीने लग्न समारंभामध्ये लोक सहभागी झाले होते आणि ज्यांनी त्याचे आयोजन केले अशा ५० पेक्षा जास्त लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

धक्कादायक! रुग्णांच्या किंकाळ्या आणि अस्वस्थ करणारी दृश्य; गोदावरी मेडिकलमधील प्रकार

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -