घरमहाराष्ट्रशिक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर छात्रभारतीचे आंदोलन

शिक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर छात्रभारतीचे आंदोलन

Subscribe

कोरोनामुळे नोकरी गमवावी लागलेल्या पालकांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क राज्य सरकारने भरावे, या मागणीसाठी छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्यावतीने बुधवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या मंत्रालय समोरील शासकीय निवासस्थानासमोर निदर्शने केली.

छात्रभारतीने २७ जुलै रोजी वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले होते. या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला होता. या इशाऱ्याकडे शालेय शिक्षणमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेने केला असून आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केल्याचे छात्रभारतीच्या नेत्यांनी सांगितले.

- Advertisement -

मोफत शिक्षणाच्या ६ मार्च १९८६ च्या परिपत्रकाची सर्व अनुदानित,विअनुदानित आणि खासगी संस्थामध्ये कठोर अंमलबजावणी करावी. दहावी, बारावीच्या परीक्षेचे शुल्क भरायला पैसे नाहीत म्हणून फॉर्म न भरल्यामुळे नापास ठरवल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना पास करावे. कोरोना काळात विद्यार्थ्यांकडून घेतलेले परीक्षा शुल्क तत्काळ परत करावे. बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत बस पास द्यावेत आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी यावेळी केल्या.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -