घरमहाराष्ट्रछत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख टाळा; 'या' खासदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख टाळा; ‘या’ खासदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Subscribe

मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणीसुद्धा त्यांनी या पत्रातून केली आहे.

कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या नावासह राज्यातील सार्वजनिक स्थळांना देण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख टाळण्याबाबतची सूचना खासदार संभाजीराजे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे. याशिवाय मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणीसुद्धा त्यांनी या पत्रातून केली आहे.

जितेंद्र आव्हाडांनी केली विनंती

राज्यातील सार्वजनिक स्थळांचा नामविस्तार करणे आवश्यक असून कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठाच्या नावातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख टाळण्याबाबतची सूचना खासदार संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. नामविस्तारासोबत मराठा आरक्षणादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणीसुद्धा त्यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यांच्याव्यतिरिक्त आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलना दरम्यान अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पण आता आपलं सरकार आलं आहे. तेव्हा आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

- Advertisement -

धनंजय मुंडेंनीसुद्धा मागणी केली

दरम्यान खासदार संभाजी राजे, जितेंद्र आव्हाड यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनीसुद्धा नव निर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. ते म्हणाले की, “मराठा समाजाने आरक्षणासाठी शांतीपूर्ण आंदोलन केले. त्यावेळी सहभागी युवकांवर तत्कालीन भाजप सरकारनं गुन्हे दाखल केले. पण आता ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. एकही तरुण या गुन्ह्यांमुळे शिक्षण, नोकरीपासून वंचित राहू नये यासाठी योग्य पाऊल उचलावे.”

खासदार संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -