एसटी कर्मचाऱ्यांची शेअर्स गुंतवणुकीच्या नावावर कोट्यवधी रुपयांची फसवणूक

ST
तब्बल पाच महिन्यांनंतर एसटीची आजपासून आंतरराज्य बससेवा सुरू होणार

एसटी महामंडळाच्या शेकडो कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मोठा आर्थिक धक्का बसला आहे. एसटी महामंडळातील शिपाई ते अधिकारी पदापर्यंतच्या दीडशे ते दोनशे जणांची आर्थिक फसवणूक झाली आहे. शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक झाली आहे. याप्रकरणात गुंतवणूक कंपनीच्या दोन भागीदारांना भाईंदरमध्ये अटक झाली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.

रतावा मिळणे बंद झाल्यानंतर पोलिसात तक्रार –

एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयातील संगणक विभागातील निवृत्त नारायण निलवे (वय69) यांची 2018मध्ये भाईदर येथील अण्णा अमृते यांच्याशी ओळख झाली. अमृते याने आपण 15 वर्षांपासून शेअर मार्केटिंगचा व्यवसाय करत असल्याचे निलवेंना सांगितले. बँकेत ठेवलेल्या रकमेवर व्याज कमी मिळत असल्याने निलवे यांनी शेअर्स गुतवणुकीमध्ये दोन लाख रुपये गुंतवले. दरमहा त्यांना या गुंतवणुकीवर दहा हजार रुपये मिळू लागले. विश्वास बसल्याने त्यांनी आणखी तीन लाख रुपये गुंतविले. यानंतरही काही महिने नियमित परतावा मिळत असल्याने त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावेही पैसे गुंतविले. काही कालावधीनंतर परतावा मिळणे बंद झाले. अमृते यांच्याकडून परतावा मिळण्यात चालढकल होत असल्याने निलवे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

पाच कोटी रुपयांची फसवणूक –

अण्णा अमृते आणि त्याचा भागीदार कुलदीप रुंगटा यांचे कार्यालय भाईंदरला असल्याने याप्रकरणात भाईंदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासामध्ये एजी सिक्युरिटीज, केके सिक्युरिटीज आणि एए सिक्युरिटीज या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली या दोघांनी सुमारे ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यामुळे गुन्हा दाखल होताच पळालेल्या अमृते आणि रुंगटा याला अटक करण्यात आली. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या वाढत असल्याने ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे. पुढील तपासआर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.