महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे यावेळीही १ ऑक्टोबरपासून काही बदल होणार आहेत. यातील काही बदल असे आहेत ज्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. त्यामुळे तुम्हाला या बदलांची आधीच जाणीव असणे महत्त्वाचे आहे. ऑक्टोबरमध्ये होणार्या या बदलांबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाही.
1. दोन हजारांची नोट कायमस्वरूपी बंद
दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद झाली आहे. जर का ती तुम्ही अजून वापरत असाल तर ती तुम्ही ते ३० सप्टेंबरपूर्वी बँकेतून बदलून घ्यावी. 1 ऑक्टोबरपासून तुमच्याकडे 2000 रुपयांची नोट असेल तर तुम्ही ती बदलू शकणार नाही. 30 सप्टेंबर 2023 हा नोटा बदलण्याचा शेवटचा दिवस असेल. यानंतर 2000 रुपयांची नोट अवैध होईल.
2. सीएनजी-पीएनजीच्या किंमतीत बदल
दुसरा बदल असा आहे कि एलपीजी व्यतिरिक्त सीएनजी-पीएनजीच्या किमतीत देखील बदल करण्यात आले आहेत. तसेच साधारणपणे, दर महिन्याच्या पहिल्या दिवशी हवाई इंधनाचे (ATF) दर बदलतात. यावेळी सीएनजी-पीएनजीसोबतच एटीएफच्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे.
3. परदेशी प्रवास महागला
जर का तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर 1 ऑक्टोबरपासून परदेश प्रवास महाग होणार आहे. तसेच १ ऑक्टोबरपासून, तुम्हाला ७ लाख रुपयांपर्यंतच्या टूर पॅकेजसाठी ५ टक्के TCX द्यावे लागतील. त्याशिवाय 7 लाख रुपयांपेक्षा जास्त टूर पॅकेजसाठी 20 टक्के TCS भरावा लागेल. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या प्रवासाच्या बजेटचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
4. योजना आधार लिंक करणे अनिवार्य
30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमचा PPF, पोस्ट ऑफिस बचत योजना आणि सुकन्या समृद्धी योजना आधारशी लिंक करा. तुम्ही असे न केल्यास, १ ऑक्टोबरपासून तुमचे खाते फ्रीज केले जाऊ शकते. म्हणजेच तुम्ही तुमच्या खात्यातून कोणत्याही प्रकारचे व्यवहार किंवा गुंतवणूक करू शकणार नाही. त्यामुळे तुमची जी काही आर्थिक खाती आहेत ती वेळेत आधारशी लिंक करणे महत्त्वाचे आहे.
5. सार्वजनिक सुट्या निमित्त बँका बंद
ऑक्टोबर महिन्यात बँकांना 16 दिवस सुट्टी असणार आहे. या सुट्ट्यांमुळे तुमच्या बँकिंग कामावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी प्रत्येक शहरात बँका बंद राहतील. याशिवाय, राज्यांवर अवलंबून काही प्रादेशिक सुट्ट्या असतील. याबद्दल तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : राज्यात लोडशेडिंगचे संकट गहिरे? वीज उत्पादन आणि मागणीचा ताळमेळ साधण्यासाठी महावितरणाची कसरत