घरमहाराष्ट्रनागपुरात ३ हजार किलो खिचडीचा विश्वविक्रम

नागपुरात ३ हजार किलो खिचडीचा विश्वविक्रम

Subscribe

शेफ विष्णू मनोहर यांनी नागपुरात तब्बल तीन हजार किलो खिचडी बनवण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिमका बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे.

खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावे या मागणीसाठी नागपुरातील सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आज तब्बल तीन हजार किलो खिचडी बनवण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. विश्व खाद्य दिनाच्या निमित्ताने खिचडीला ‘राष्ट्रीय अन्न’ म्हणून घोषित करावे, अशी मनोहर यांची मागणी आहे. नागपुरातील चिटणीस पार्क स्टेडियम येथे विष्णू मनोहर यांनी हा विक्रम रचला. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये खिचडीची नोंद

मनोहर यांनी वेगवेगळे जिन्नस वापरून ३ हजार किलोची खिचडी एकाच भांड्यात तयार केली आहे. त्यांच्या या महाकाय रेसिपीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिमका बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. यापूर्वी मनोहर यांनी सलग ५३ तास नॉनस्टॉप कुकींगचा प्रयत्न केला होता. परंतु, काही तांत्रिक चुकांमुळे त्याची विश्वविक्रम म्हणून नोंद होऊ शकली नव्हीत. त्यामुळे दुसरा एखादा विक्रम प्रस्थापित करावा असा त्यांचा मानस होता. त्यानुसार जागतिक खाद्य दिनाच्या निमित्ताने आज त्यांनी ३ हजार किलो खिचडी तयार केली. ही खिचडी तयार करण्यासाठी त्यांनी कोल्हापूर येथून खास कढई तयार केली. ही खिचडी तयार करण्यासाठी त्यांनी ११ फुटाचा सराटा वापरला. लाकडाच्या इंधनाचा वापर करून खिचडी तयार केली.

- Advertisement -

अनाथाल आणि अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना आमंत्रण

विष्णू मनोहर यांनी पहाटे ५.३० वाजेपासून या विश्वविक्रमी खिचडीचे नियोजन सुरू केले होते. तब्बल ५ परीक्षकांच्या उपस्थितीत हा खिचडीचा घाट घालण्यात आला. त्यासाठी ५७५ किलो डाळ, ५७६ किलो तांदूळ, १०० किलो तुप २५० किलो भाजी आणि १०८ किलो मसाल्यांचा वापर करण्यात आला. महाकाय कढईत बनवली जाणारी ही खिचडी सकाळी १० वाजेच्या सुमारास तयार झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खिचडीची पहिली चव चाखली. यावेळी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रा. संजय भेंडे, प्रमोद पेंडके प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी स्थानिक अनाथाल आणि अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना खास खिचडी खाण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

हेही वाचा – प्रियांकाच्या ट्विटवर कमेंट करणे भारतीय शेफला पडले महागात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -