घरताज्या घडामोडीSerum Institute Fire: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ‘सीरम’ला भेट देणार

Serum Institute Fire: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ‘सीरम’ला भेट देणार

Subscribe

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील मांजरी या उपनगरातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या नव्या इमारतीला गुरुवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास लागलेली आग लागली. ही भीषण आग आटोक्यात आली असून यात पाच जणांचा मृत्यू झाला, तर अन्य चार जण जखमी झाले. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, या गंभीर घटनेची तातडीने दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री आठच्या सुमारास तेथे भेट देऊन पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी साडे चार वाजता भेट देणार आहेत.

इमारतीचा सहावा मजला आगीच्या भक्ष्यस्थानी

या ठिकाणी लागलेली आग सुमारे दहा अग्निशमन दलाच्या बंबांच्या मदतीने आटोक्यात आणण्यात यश मिळाले. इमारतीचा सहावा मजला आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र या आगीत प्रतीक पाष्टे (डेक्कन, पुणे), महेंद्र इंगळे (नऱ्हे, पुणे), रमा शंकर हरिजन (उत्तर प्रदेश), बिपिन सरोज (उत्तर प्रदेश), सुशील कुमार पांडे (बिहार) या कामगारांचा मृत्यू झाला. तर अन्य चार जण जखमी झाले. हे सर्वजण याच इमारतीत वेल्डिंगचे काम करत असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

पुन्हा एकदा आग भडकली

दरम्यान, इन्स्टिट्यूटच्या त्याच मजल्याच्या दुसऱ्या बाजूला संध्याकाळी पावणे सात वाजता पुन्हा आग भडकली दोन बंबांच्या सहाय्याने ती आटोक्यात आणण्यात आली. रात्री आठच्या सुमारास अजित पवार यांनी येथे भेट दिली. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आमदार चेतन तुपे, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सीरम इन्स्टिट्यूटचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अजित पवारांनी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली

कोरोनाप्रतिबंधक लसीमुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नकाशावर स्थान मिळवलेल्या सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग आणि आगीत पाच जणांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत अजित पवार यांनी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या. यावेळी ‘कोविडप्रतिबंधक लसनिर्मिती आणि लससाठ्यांचा आग लागलेल्या इमारतीशी कोणताही संबंध नाही. कोविड लस कार्यक्रम पूर्णपणे सुरक्षित आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री शुक्रवारी दुपारी येथे भेट देणार असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

अग्निशमन दलाच्या जवानांच्या कामगिरीबद्दल कौतुक

‘आग लागलेल्या इमारतीत अंधार असल्याने रात्री तपासणी करणे शक्य नाही. त्यामुळे शुक्रवारी सकाळी संबंधित तज्ज्ञांच्या पथकांकडून दुर्घटनेतील प्रत्येक मजल्याची तपासणी करण्यात येईल. त्यातून आगीचे कारण स्पष्ट होण्यास मदत होईल. इन्स्टिट्यूट ‘एसईझेड’ क्षेत्रात असून या इमारतीचे फायर ऑडिट, एनर्जी ऑडिट तसेच इतर आवश्यक तपासण्यांची पूर्तता करण्यात आली होती का, याचीही चौकशी करण्यात येईल’, असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. अग्निशमन दलाच्या अधिकारी-जवानांनी बजावलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले.


हेही वाचा – सीरममध्ये या कारणामुळे आग लागली, आगीच्या भडक्यात ५ जणांचा मृत्यू – राजेश टोपे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -