घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरऔरंगाबादमध्ये केमिकलच्या स्फोटात घर कोसळून एक ठार, 3 जखमी

औरंगाबादमध्ये केमिकलच्या स्फोटात घर कोसळून एक ठार, 3 जखमी

Subscribe

केमिकलच्या स्फोटात एकाचा मृत्यू आणि तीन जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली. टँकर मागे घेताना त्यामधील केमीकल खाली पडून स्फोट झाला. या स्फोटात एक घर कोसळले.

केमिकलच्या स्फोटात एकाचा मृत्यू आणि तीन जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली. टँकर मागे घेताना त्यामधील केमिकल खाली पडून स्फोट झाला. या स्फोटात एक घर कोसळले. या घटनेत घरामध्ये असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर त्याचे आई-वडील आणि भाऊ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (chemical explosion in aurangabad one die and three injured in the blast)

मिळालेल्या माहितीनुसार, भावनेश नंदू पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. तर नंदू पवार, चंदा पवार आणि योगेश पवार हे या घटनेमध्ये जखमी झाले आहेत. औरंगाबाद शहरातील हर्सूल परिसरातल्या चेतना नगरमध्ये असलेल्या वीटभट्टीजवळ केमीकलचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. हर्सूल परिसरातल्या चेतना नगरमध्ये असलेल्या वीटभट्टीजवळ पवार कुटुंब वास्तव्यास आहे. या केमिकलच्या स्फोटानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्रीच्या सुमारास टँकर मागे घेत असताना त्यामधील केमिकल खाली पडले, या केमिकलचा स्फोट झाला. स्फोटाचा हादरा बसल्याने घर कोसळले. या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी झाले आहेत.

केमिकल स्फोटात ज्याचे घर उद्ध्वस्त झाले ते, पवार कुटुंब या परिसरात मजुरीचे काम करतात. विटापासून बनवलेल्या कच्च्या घरात राहत होते. केमिकलच्या स्फोटामुळे या घराला जोरदार हादरा बसला. घर पक्क नसल्यामुळे वीटा आणि पत्रे या मजुरांच्या अंगावर कोसळले. या घटनेत भावनेशला आपला जीव गमवावा लागला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ग्रेटर नोएडामध्ये रस्ते अपघातात 4 जणांचा मृत्यू; 3 जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -