HomeमनोरंजनChhaava Controversy : अखेर ठरले, छावा चित्रपटातील ती दृष्ये डिलीट होणार; ठाकरेंना...

Chhaava Controversy : अखेर ठरले, छावा चित्रपटातील ती दृष्ये डिलीट होणार; ठाकरेंना भेटताच दिग्दर्शकाचा निर्णय

Subscribe

छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मोठा निर्णय घेतला असून चित्रपटातील वाद निर्माण होणारे दृष्य काढून टाकण्यात येणार आहे.

मुंबई : बहुप्रतिक्षित अशा छावा चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याची ज्याप्रमाणे सर्वांना उत्सुकता होती, त्याचप्रमाणे याच्या ट्रेलरची सुद्धा सर्वांना उत्सुकता होती. मात्र, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटले. कारण यामध्ये शंभूराजे आणि येसुबाई यांना लेझीम खेळताना दाखवण्यात आले आहे. ज्याबाबत अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आणि स्वतः संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला. ज्यानंतर याबाबत आता चर्चा करण्यासाठी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मोठा निर्णय घेतला असून चित्रपटातील वाद निर्माण होणारे दृष्य काढून टाकण्यात येणार आहे. (Chhaava Controversy Director Laxman Utekar has decided to delete controversial scene after meeting Raj Thackeray)

छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेला आगामी ‘छावा’ चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे. पण प्रदर्शनापुर्वी निर्माण झालेल्या वादामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत त्यांनी म्हटले की, आज राज ठाकरेंची भेट त्यांचा सल्ला घेण्यासाठी होती. त्यांचे वाचन दांडगे आहे, त्यांना इतिहास ज्ञात आहे. त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवरही खूप वाचन आहे. त्यामुळे चित्रपटात नेमका काय बदल करावा? हे मी त्यांच्याकडून जाणून घेतल आणि याच चर्चेतून त्यांनी मला काही सूचना केल्या आहेत. ते बदल आम्ही करणार आहोत.

हेही वाचा… Akshay Kumar : ‘स्काय फोर्स’ची तिसऱ्या दिवशी करोडोंची कमाई, खिलाडीचा सिनेमा हिट ठरणार?

तसेच, ज्या महाराजांच्या लेझीम खेळणाऱ्या सीनवरुन वाद सुरू आहे, तो आम्ही डिलीट करणार आहोत, असे यावेळी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. राज ठाकरेंनीही तोच सल्ला दिला आहे. जर कोणाला वाटत असेल, आमचे राजे असे लेझीम खेळत नसतील, तर आम्ही तो सीन चित्रपटातून काढून टाकणार. कारण तो फिल्मचा खूप मोठा भाग नाहीये, एक छोटासा सीन आहे. त्यामुळे तो आम्ही काढून टाकणार. आमची संपूर्ण टीम यावर गेली चार वर्ष काम करत होती. हा सिनेमा बनवण्यामागचा उद्देश एकच होता की, छत्रपती संभाजी महाराज काय होते? हे संपूर्ण जगाला कळावे, ती व्यक्ती काय होती, ते किती मोठे योद्धा होते, राजा होते… हे संपूर्ण जगाला कळावे. पण एखाद, दोन गोष्टी जर त्याला गालबोट लावत असतील, तर त्या डिलीट करायला आम्हाला काही हरकत नाही, असेही यावेळी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी स्पष्ट केले आहे.

छावा चित्रपटात संभाजी महाराज नृत्य करतानाची दृष्य दाखवताना काय विचार करण्यात आला होता. यातून कोणता संदेश द्यायचा होता? असा प्रश्न दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना विचारण्यात आला असता त्यांनी सांगितले की, शिवाजी सावंत यांची जी छावा कादंबरी आहे, त्या कादंबरीवर हा चित्रपट आहे. इतिहासाला खूप वेगवेगळे पदर आहेत. त्यामुळे नेमका हात कुठे घालायचा? असे असताना आम्ही छावा कादंबरीचे ऑफिशियल राईट्स घेऊन त्या कादंबरीवर हा चित्रपट बनवला आहे. त्या कादंबरीत लिहिले आहे की, छत्रपती संभाजी महाराज होळी साजरा करायचे. होळीच्या आगीतून नारळ खेचून घ्यायचे. त्यामुळे लेझीम हा आपला पारंपारिक खेळ आहे. असे नाही की त्यात कोणते आजचे नृत्य आहेत. महाराज असे काही करत आहेत की ज्यामुळे आपल्याला लाज वाटावी, असेही नाहीये. संभाजी महाराज कधी लेझीम खेळले नसतील का? कारण ते 20 वर्षांचे होते जेव्हा महाराजांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला केला. ते जिंकले त्यानंतर ते रायगडावर आले, त्यावेळी एक 20 वर्षांचा राजा खेळलाही असेल लेझीम… त्यात गैर काय असे मला वाटत नाही. पण शिवप्रेमींच्या भावना दुखावत असतील, तर तो चित्रपटापेक्षा किंवा महाराजांपेक्षा मोठा नाही. त्यामुळे तो आम्ही नक्की डिलीट करू, असे यावेळी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.