Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी लॉकडाऊनमध्ये पुन्हा मोफत धान्य देण्यावर विचार - छगन भुजबळ

लॉकडाऊनमध्ये पुन्हा मोफत धान्य देण्यावर विचार – छगन भुजबळ

लॉकडाऊमध्ये अत्यावश्यक सेवा सुरु राहतील

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात येण्याची शक्यता आहे. जर पुन्हा लॉकडाऊन झाला तर पुन्हा मोफत अन्न धान्य देण्याबाबत विचार सुरु आहे. तसेच अत्यावश्यक सेवा सुरु राहतील असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. लॉकडाऊन झाल्यास सगळ्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला पाहीजे, लॉकडाऊनवरुन राजकारण नको आपण राजकारण जनतेसाठी करतो जनता वाचली तर आपण राजकारण करु शेवटी आपले लोक जगले पाहिजेत असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊमध्ये अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, दूध, अन्न धान्य वितरण केंद्र, औषधाचे अजिबात कमतरता येता कामा नये यासाठी याबाबतच्या उद्योगांना सूट असेल, शेतींच्या कामामध्ये सूट असेल शेतात पाणी द्यायला पाहिजे, शेती उद्योगाला सूटवर विचार सुरु आहे. मागील लॉकडाऊनमध्ये जसे गरीब अन्न योजनेअंतर्गत आपण मोफत अन्न धान्य देत होतो. या लॉकडाऊमध्येही पुन्हा मोफत अन्न धान्य देण्याबाबत विचार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

कोरोना परिस्थिती रोखण्यासाठी नागरिकांनीही थोडे दिवस आहे त्यात समाधान माणून काही दिवस घरात बसून सरकारला सहकार्य केले पाहिजे. सामाजिक अंतर , मुखपट्टी वापरणे या नियमांचे पालन केले पाहिजे. संचारबंदीत बाहेर पडू नका, राज्यात सर्वच जिल्ह्यात कोरोना परिस्थिती भयावह झाली असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. अनेक आरोग्यविषयक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात बसावं आणि माझी कुटुंब माझी जबाबदारी याचा पूर्ण पालन करावे असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे.

- Advertisement -