घरताज्या घडामोडीकोरोना नियमांच्या उल्लंघनामुळे कडक निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा लागेल, छगन भुजबळांचा इशारा

कोरोना नियमांच्या उल्लंघनामुळे कडक निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा लागेल, छगन भुजबळांचा इशारा

Subscribe

मोदी हेलिकॉप्टरने जाणार होते परंतु वातावरणामुळे हेलिकॉप्टरच्या ऐवजी रस्त्याने जाणे पसंत केलं तेव्हा शेतकऱ्यांचा मोर्चा आडवा आला त्यामुळे ते परत आले. तिथल्या मुख्यमंत्र्यांचे म्हणणे असे आहे की, ६० ते ७० हजार लोकांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आली होती

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात आणि नाशिकमध्ये कडक निर्बंध लावण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती दिली आहे. नाशिकमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच मुंबई आणि ठाण्यातही रुग्णांची संख्या वाढली आहे. संध्याकाळी ४ वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये कोरोना निर्बंधांबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे भुजबळ म्हणाले आहेत. नागरिक नियमांचे पालन करत नसल्यामुळे कडक निर्बंध लावावे लागणार आहेत असेही भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.

अल्पसंख्यांक मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना कडक निर्बंध लावण्याबाबतचा इशारा दिला आहे. भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये एकदम ५०८ रुग्ण वाढले आहेत. सगळीकडे रुग्ण वाढत आहेत. शहरात, तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. मुंबई, ठाण्यातही रुग्णसंख्या वाढत आहेत. सगळी तयारी करण्यात आली आहे. संध्याकाळी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन काय करता येईल यावर निर्णय घेण्यात येणार आहे. असे भुजबळ म्हणाले आहेत.

- Advertisement -

लॉकडाऊन करावा असे मत नाही

लोकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गर्दी करु नका असे सांगण्यात येत आहे. हॉलमध्ये ५० जणांना परवानगी देण्यात आली आहे. परंतु तरिही हॉलमध्ये ४०० ते ५०० लोकांची गर्दी होते. कारवाई होते म्हणून आता लोकांनी हॉलमध्ये लग्न करण्याचे सोडून खुल्या जागेत लग्न करत आहेत. तिकडे गर्दी करत आहेत. कोरोनाच्या नावाखाली लोकांना भीती दाखवावी असा हेतू नाही. लॉकडाऊन करुन पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण करावी असे वाटत नाही. कारण लोकांची गैरसोय होते. यामध्ये काय निर्णय घेता येईल याबाबत विचार करु असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

पंतप्रधानांनी रस्त्याने जाण्याचा मार्ग निवडला

पंतप्रधानांच्या बाबत असे होऊ नये त्यांची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. तिथली परिस्थिती पाहिली तर त्याच्यात फरक आहे. मी जर येवल्याला हेलिकॉप्टरने जाणार आहे तर तिकडे पोलीस बंदोबस्ताची गरज नाही. जर अचानक पाऊस आला तर हेलीकॉप्टरने न जाण्याचे ठरले तर अचानक पोलीस व्यवस्था तैनात करणं शक्य होत नाही. मोदी हेलिकॉप्टरने जाणार होते परंतु वातावरणामुळे हेलिकॉप्टरच्या ऐवजी रस्त्याने जाणे पसंत केलं तेव्हा शेतकऱ्यांचा मोर्चा आडवा आला त्यामुळे ते परत आले. तिथल्या मुख्यमंत्र्यांचे म्हणणे असे आहे की, ६० ते ७० हजार लोकांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आली होती परंतु ५०० लोक उपस्थित असल्यामुळे मोदी आले नाही. परंतु सर्व राज्याने पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतेही गफलत होता नाही. परंतु याचा फार मोठा बाऊ करुन विरोधकांच्या विरोधात वापरण्याचा प्रयत्न होता कामा नये.

- Advertisement -

हेही वाचा : Third Wave : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा आता संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक, नीती आयोगाने केले सावध

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -