घरताज्या घडामोडीराष्ट्रवादीच्या जास्त जागा आल्या तर दादाच मुख्यमंत्री, छगन भुजबळांचा विश्वास

राष्ट्रवादीच्या जास्त जागा आल्या तर दादाच मुख्यमंत्री, छगन भुजबळांचा विश्वास

Subscribe

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावले जात आहेत. सध्या लोकसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, अशी आमदार नरहरी झिरवाळ यांची सदिच्छा आहे. मात्र, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त मेहनत घ्यावी लागेल. कारण अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. जर महाविकास आघाडीच्या जास्त जागा निवडून आल्या तर अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सुरगाणा (surgana) येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नरहरी झिरवाळ यांनी भाषणादरम्यान अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य केले होते. त्यावर भुजबळ म्हणाले की, अशी झिरवाळ यांची सदिच्छा आहे. मात्र यासाठी महाविकास आघाडी म्हणून जास्त जागा निवडून आल्या पाहिजे. त्यात राष्ट्रवादीच्या जास्त जागा आल्या तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, असं छगन भुजबळ म्हणाले.

- Advertisement -

निवडणूक आली म्हणून आम्ही अधिवेशन घेतले, असे बोलले जात आहे. हे त्यांचे अज्ञान आहे. ओबीसींसाठी आजवर काय केले, तुम्ही काय करत होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि छगन भुजबळ लढत आहे. भिडे वाडा आरक्षणसाठी लढत आहे. सावित्रीबाई फुले यांच्याबाबत भाष्य केले. त्यांचे पुतळे हटवले, तेव्हा आम्ही बोललो. ओबीसीबाबतीत आम्ही सतर्क आहोत, असंही भुजबळ म्हणाले.

पुण्यातील मुळशी तालुक्यातील दोन पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खडसावले, त्यावर भुजबळ म्हणाले की, कानात ओरडून सांगेन असा त्याचा अर्थ आहे. अजित पवार यांनाही तेच म्हणायचं होतं. ओरडले म्हणजे ऐकू जाते, असे म्हणत भुजबळांनी अजित पवारांना सावरुन घेण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

हेही वाचा : Ajit Pawar: एकेकाच्या कानशिलात लगावीन, पुण्यातील दोन पदाधिकाऱ्यांना दादांनी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -