घरमहाराष्ट्रChhagan Bhujbal on Maratha Reservation : "झुंडशाहीच्या पुढे नमते घेऊन...", भुजबळांची सरकारवर...

Chhagan Bhujbal on Maratha Reservation : “झुंडशाहीच्या पुढे नमते घेऊन…”, भुजबळांची सरकारवर टीका

Subscribe

मंडल आयोगाच्या विरोधात आवाज उठवावा आणि त्यांच्याविरोधात कारवाई करावी. मंडल आयोगाला संपवण्याचे काम द्यांनी करून दाखवावे, असे खुले आव्हान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

मुंबई : ‘झुंडशाहीच्या पुढे नमते घेऊन मागच्या दाराने लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे’, अशी टीका राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने कुणबी नोंदी नसलेल्यांसाठी ‘सगेसोयरे’ शब्दावर प्रमाणपत्र देण्यासाठी अधिसूचना काढल्या आहेत. सरकारच्या अधिसूचनेला छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. ‘आमदारपासून ते मंत्र्यांपर्यंत आमची कैफियत मांडणे, न्यायालयाचे धाव घेणे आणि लोकांमध्ये जनजागृती करणे, हेच मार्ग आमच्यासमोर उरले आहे’, अशी खंत देखील छनग भुजबळ यांनी बोलून दाखविली आहे.

छगन भुजबळ म्हणाले, “ओबीसींवर अन्याय होत आहे, ओबीसींचे आरक्षण आता संपुष्टात येत आहे. आता संपूर्ण मराठा समाज हा कुणबी दाखले देऊन मागच्या दरवाजाने घुसवण्यात आले आहे. मराठा समजाला वेगळे आरक्षण द्यावे, असे आमचे म्हणणे होते. त्यासाठी सरकारने आयोगाची स्थापना देखील केली आहे, त्यांचे काम सुरू आहे. पण झुंडशाहीच्या पुढे नमते घेऊन मागच्या दरवाजाने लाखो दाखले देण्याचे काम सुरू आहे. यानंतर त्यांचे सगेसोयऱ्ये यांना देखील प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे ओबीसी आणि भटक्या विमुक्त यांचे आरक्षण संपुष्टात येत आहे. मग आम्हाला दुसरा पर्याय काय? असा सवाल छगन भुजबळ म्हणाले. आमच्याकडे आमदारांपासून ते मंत्र्यांपर्यंत आणि न्यायालयात जाऊन कैफियत मांडणार आहे. ओबीसी समाजाची जागृती करत रॅली आणि मोर्चा काढणार आहे. लोकशाहीने आम्हाला जे काही अधिकार दिलेत, त्यांचा वापर आम्ही करत आहोत, असेही छगन भुबळ म्हणाले.

- Advertisement -

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन आणि उपोषण करण्याचा इशारा सरकारला दिला आहे? या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले, “आता राज्य सरकारचे सचिव, मंत्री आणि मध्यस्त असतील, ते तडकाफडकी जातील, त्यांच्या गाड्याबिड्या तयार होत असतील आणि काही जीआर काढायचे असतील तेही फटाफट काढतील”, अशी अप्रत्यक्ष टीका छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर केली आहे.

हेही वाचा – Khichadi Scam: आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या; राहुल कनाल यांचं राऊतांना Open Challenge

- Advertisement -

हिंमत असेल तर मंडल आयोगाविरोधात कारवाई करा

मंडल आयोगाला आव्हान देण्याचा प्रयत्ना केला जातील? या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले, “त्यांनी मंडल आयोगाला आव्हान द्यालाच पाहिजे. कारण त्यांच्याऐवढा ज्ञानी भारतात दुसरा कोणीही आहे का त्यांच्याकडे ताकद देखील आहे. तीन कोटी मराठा ते मुंबईत आणणार होते. ते सर्वांनी बघितले की, वाशीमध्ये किती 3 कोटी म्हणजे ज्याला लाख आणि कोटी समजत नाही, असे लोक आता मंडल आयोगाला विरोध करणार आहेत, त्यांनी ते आवश्यक करावे. त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरोधात आवाज उठवावा आणि त्यांच्याविरोधात कारवाई करावी. मंडल आयोगाला संपवण्याचे काम द्यांनी करून दाखवावे, हे माझे त्यांना आव्हान आहे.”

हेही वाचा – Maratha Reservation : “सरकारने काढलेली अधिसूचना अंतिम निर्णय नाही”, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान

मी एका वर्गासाठी लढत आहे

नारायण राणेंनी म्हटले की, कुणबी आणि मराठे हे वेगवेळे आहेत. पण राणे समितीत त्यात कुणबी आणि मराठे एकच आहेत, असे नमुद केले आहे, यावर छगन भुजबळ म्हणाले, “त्याबाबत मला माहिती नाही. मराठा समाजाचे जे जाणकार नेते आणि कार्यकर्ते त्यांचे म्हणणे आहे की, आम्हाला वेगळे आरक्षण द्या, आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण देऊ नका आणि आमचेही म्हणणे तेच आहे. मराठा आरक्षणासाठी दोन वेळा कायदा तयार करण्यात आला. त्यात तुटी आढळून आले. ते दूर करण्याचे काम सरकार करत आहेत. पण मागच्या दरवाज्यांनी काही लोकांना खोटी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे. सगेसोयरे या झुंडशाहीच्या पुढे नमते घेऊन जो कार्यक्रम सुरू आहे. त्याला आमचा विरोध आहे. भटक्या विमुक्त आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. तुम्हाला 10, 15, 20, 25 टक्के आहे. पण आमच्या आरक्षणला धक्का लागता कामा नये. ओबीसीमध्ये 375 समाज आहे. ते फक्त मराठा जातीसाठी लढत आहेत. पण मी एका वर्गासाठी लढत आहे. तो वर्ग मागास आहे, त्यात पावणे चारशे जाती आहेत. त्यांच्यासाठी मी लढत आहे”, छगन भुजबळांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -