घरमहाराष्ट्रChhagan Bhujbal on Maratha Reservation : "ओबीसींच्या घरांसमोर उन्मादी उत्सव केला जातोय",...

Chhagan Bhujbal on Maratha Reservation : “ओबीसींच्या घरांसमोर उन्मादी उत्सव केला जातोय”, छगन भुजबळांचा दावा

Subscribe

मंडल आयोगाच्या विरोधात आवाज उठवावा आणि त्यांच्याविरोधात कारवाई करावी. मंडल आयोगाला संपवण्याचे काम द्यांनी करून दाखवावे, असे खुले आव्हान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

मुंबई : गावागावात गेली तीन ते चार दिवस उन्मादी उत्सव सुरू आहे. ओबीसींच्या घरांसमोर उन्मादी उत्सव केला जात आहे, असा दावा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. राज्यभरात ओबीसी एल्गार यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलतना दिली आहे. ज्या गावात दोन-तीन ओबीसींची घरे आहेत. ती घरे सोडत आहेत, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. मंत्रीपदाचा राजीनामा देणार का? या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी ‘नो कमेंट’ एवढेच उत्तर दिले.

नगरमध्ये तुमच्याविरोधात रोष व्यक्त केला जात आहे, या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले, “गेली तीन-चार दिवस गावागावत जो उन्मादी उत्सव सुरू आहे. रात्री तीन-तीन वाजेपर्यंत डीजे वाजवून जिथे ओबीसींची घरे आहेत. त्यांना त्रास दिला जात आहे. हा प्रकार गावागावात सुरू झालेला आहे. माझ्यापर्यंत दोन-तीन प्रकरणे आली की, जिथे ओबीसींचे एक-दोन घरे आहेत, ते गाव सोडत आहेत. ज्यावेळा विजय उन्माद आम्ही जिंकलो, आम्हाला आरक्षण मिळाले, त्यांचा उन्मादी उत्सव सुरू आहे. विजय साजरा करण्यास आमचा विरोध नाही आणि तो ओबीसी विरोधात शिवीगाळ देत आहे. डीजेवर माझ्याविरोधात शिवीगाळ करणारी गाणी वाजवली जात आहे. हे सर्व आम्ही पाहत आहोत. ही भयकर परिस्थिती राज्यात निर्माण झालेली आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – Babanrao Taywade : ओबीसीत फूट? भुजबळ, वडेट्टीवार दिशाभूल करतायत; तायवाडेंच्या आरोपाने खळबळ

हिंमत असेल तर मंडल आयोगाविरोधात कारवाई करा

मंडल आयोगाला आव्हान देण्याचा प्रयत्ना केला जातील? या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले, “त्यांनी मंडल आयोगाला आव्हान द्यालाच पाहिजे. कारण त्यांच्याऐवढा ज्ञानी भारतात दुसरा कोणीही आहे का त्यांच्याकडे ताकद देखील आहे. तीन कोटी मराठा ते मुंबईत आणणार होते. ते सर्वांनी बघितले की, वाशीमध्ये किती 3 कोटी म्हणजे ज्याला लाख आणि कोटी समजत नाही, असे लोक आता मंडल आयोगाला विरोध करणार आहेत, त्यांनी ते आवश्यक करावे. त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरोधात आवाज उठवावा आणि त्यांच्याविरोधात कारवाई करावी. मंडल आयोगाला संपवण्याचे काम द्यांनी करून दाखवावे, हे माझे त्यांना आव्हान आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -