घरमहाराष्ट्रChhagan Bhujbal : रामदास आठवलेंनी छगन भुजबळांना आरपीआयमध्ये येण्याची दिली ऑफर

Chhagan Bhujbal : रामदास आठवलेंनी छगन भुजबळांना आरपीआयमध्ये येण्याची दिली ऑफर

Subscribe

छगन भुजबळांनी 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, असा गौप्यस्फोट नगर येथील ओबीसींच्या एल्गार परिषदेत केला.

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर आहे, असा दावा समाजसेविका अंजली दमानिया यांनी केला होता.दमानियांच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या होत्या. पण भाजपाकडून मला कोणतीही ऑफर नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. यामुळे छगन भुजबळ हे भाजपामध्ये जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असला तरीही आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी छगन भुजबळ यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)मध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

आपण 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पण अद्यापही राजीनामा मंजूर झाला नाही, असा गौप्यस्फोट नगर येथील ओबीसींच्या एल्गार परिषदेत केला. राजीनाम्याची कुठेही वाच्यता करू नका, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते, असाही खुलासा भुजबळांनी याच सभेत केला.

- Advertisement -

हेही वाचा – Chhagan Bhujbal : अहमदनगरचा मेळावा भविष्यातील मोठ्या क्रांतीची बीजे ठरणार; सरकारवर पुन्हा हल्लाबोल

भुजबळांना आरपीआयमध्ये येण्याची खुली ऑफर

भुजबळांनी ओबीसींच्या मुद्यावरून मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंनी भुजबळांना आरपीआयमध्ये येण्याची खुली ऑफर यांनी दिली आहे. रामदास आठवलेंनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ही ऑफर दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Chhagan Bhujbal : “सर्वेक्षणावेळी फक्त जात विचारली जाते”, छगन भुजबळांची टीका

अंजली दमानिया ट्वीटमध्ये नेमके काय म्हटले?

छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर आहे, असे ट्वीट अंजली दमानिया यांनी केले होते. अंजली दमानिया ट्वीटमध्ये म्हणाल्या, “भुजबळ भाजपाच्या वाटेवर? एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप”, असे ट्वीट करत भाजपावर हल्लाबोल केला आहे. यामुळे अंजली दमानिया यांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

मला कोणतीही ऑफर नाही; भुजबळ

छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर आहे, असे ट्वीट अंजली दमानिया यांनी केले. पण अंजली दमानिया यांना कुठून माहिती मिळाली यांची कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ आज माध्यमांशी बोलताना दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले, “मला कुठल्या पदाची हौस नाही. मी ओबीसींसाठी 35 वर्षापासून काम करत आहे. अंजली दमानिया यांना कुठून माहिती मिळाली आणि याबद्दल मला काही माहिती नाही. पण मला कोणतेही प्रपोजल आलेले नाही. मी देशभर ओबीसींसाठी काम करत आहे.”

हेही वाचा – Reservation : …कुठे फेडाल हे पाप? ‘हा’ दावा करत अंजली दमानिया यांचे भाजपावर टीकास्त्र

छगन भुजबळांचा अल्पपरिचय

छगन भुजबळ यांच्या राजकीय कारर्कीदीची सुरुवात ही शिवसेनेतून झाली आहे. छगन भुजबळांनी शिवसेनेतून नगरसेवक ते मुंबईचे महापौर पदे भूषविले आहे. पण भुजबळांनी ओबीसी मंडल आयोगाच्या मुद्यावरून शिवसेनेतून बाहेर पडले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांना कॅबिनेटमंत्री देखील राहिले आहेत आणि त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री पद देखील भूषविले आहे. गेल्या वर्षी छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारासोबत गेले. यानंतर छगन भुजबळ यांच्याकडे अन्न-नागरी पुरवठा मंत्री पद मिळाले. सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भुजबळांनी सरकारवर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आहे. पण भुजबळांचा राजीनामा अद्यापही मंजूर झालेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -