तांबे पिता-पुत्रांच्या निर्णयामुळे थोरातांचे खच्चीकरण, राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

congress balasaheb thorat
congress balasaheb thorat

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसचे निलंबित नेते आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. तांबे पिता-पुत्रांच्या निर्णयामुळे थोरातांचे खच्चीकरण झाल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, डॉ. सुधीर तांबे दोन ते तिन वेळा विधानपरिषदेवर गेले आहेत. त्यांचा स्वभाव खूप साधा आहे. त्यांचे मेहुणे पुढारी नेते असले तरी त्यांना गर्व नव्हता. त्यांनी असं का केलं हे कळत नाही. त्यांनी सरळ सांगायला पाहीजे होतं की, मला एबी फॉर्म नको. मी उभा राहणार नाही. एबी फॉर्म द्यायचा असेल तर सत्यजित तांबेंना द्या. सत्यजित तांबेंना सुद्धा एबी फॉर्म देता आला असता. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणले, छगन भुजबळ म्हणाले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सत्यजीत तांबे यांचे मामा आहेत. त्यामुळे तांबे पिता-पुत्रांच्या निर्णयामुळे थोरात यांचे खच्चीकरण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अपक्ष उमेदवार असलो तरी अनेक संघटनांचा मला पाठिंबा – सत्यजित तांबे

मला पाठिंबा देण्याबाबत जाहीर केल्यानंतर एक अधिकृत पत्रही देण्यात आलं. त्यामुळे मी या संघटनेचे आभार मानतो. टीडीएफच्या पाचही जिल्ह्यांचे सर्व पदाधिकारी धुळे, जळगाव, नंदूरबार, अहमदनगर आणि नाशिकमधील सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो. एनडीएसटी ही संघटना नाशिक जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनीही मला पाठिंबा दिला. त्याबद्दल मी संस्थेचे अध्यक्ष अरूण पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो.

टीडीएफसह शिक्षक भारतीने देखील मला पाठिंबा जाहीर केला आहे. अनेक संघटनांनी मला पाठिंबा दिला आहे. मी अपक्ष उमेदवार असलो तरी मला पाठिंबा देण्याचं काम अनेक संस्था आणि संघटनांनी केलं आहे. तसेच राजकीय प्रश्नांचं उत्तर वेळ आल्यावर देईन, असं सत्यजित तांबे म्हणाले.


हेही वाचा : अपक्ष उमेदवार असलो तरी अनेक संघटनांचा मला पाठिंबा – सत्यजित तांबे