‘महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आलं पण…’ शिंदेंच्या बंडखोरीवर छगन भुजबळांची सुचक प्रतिक्रिया

शिवसेनेप्रमाणे काँग्रेसचे आमदार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देत भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादीचे पण सगळे आमदार रिचेबल आहेत, काँग्रेसचे पण सर्व आमदार रिचेबल आहेत. शिवसेनेचे अर्धे रिचेबल आहे आणि आता जे अन रिचेबल आहेत ते हळूहळू रिचेबल होतील

chhagan bhujbal

राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारवर आलेल्या संकटावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी सुचक विधान केलं आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आलं पण हे वादळ जसं येतं तसे ते शांतही होत. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत राजकीय वातावरण शांत होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आमदार एकनाथ शिंदे यांनी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना पक्षांनी मिळून बनवलेल्या सरकारला जेरीस आणले आहे. एकनाथ शिंदे ३० पेक्षा जास्त आमदारांना घेऊन कालपासून महाविकास आघाडीमध्ये किंवा शिवसेना नेत्यांच्या संपर्कात नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे या आमदारांसोबत मोठ्या बंडाच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदेंच्या या बंडामुळे आता शिवसेना आणि एकूणच महाविकास आघाडी सरकार धर्मसंकटात सापडली आहे.

दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आणि महाविकास आघाडी सरकारवरील संकट पाहता आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची शिवसेना नेत्यांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

छगन भुजबळ म्हणाले की, हा शिवसेनेचा हा अंतर्ग प्रश्न आहे, काहीसा वेळ पण.. हे वादळ निश्चितपणे शमल्याशिवाय राहणार नाही. सरकार काय धोका? सरकारला काही धोका नाही. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष मजबूत आहे तोपर्यंत सरकारला काही धोका नाही. सर्वांना वाटत काही तरी होणार काही तरी होणार… ठीक आहे. शिवसेनेचे देखील सुरतला पोहचले आहेत, ते एकनाथ शिंदे यांची समजूत काढतील, काही असेल तरी शिवसैनिक परत येतील, अस वाटतयं, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

एकनाथ शिंदेंची गटनेते पदावरून हकालपट्टी

एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेते पदावरून हटवण्यात आले. एकनाथ शिंदेंवर शिवसेने पक्ष श्रेष्ठींनी केलेल्या या कारवाईबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. त्यामुळे सर्व आमदारांना सांभाळण्यासाठी एखाद्या गटनेत्याची नियुक्ती करावीच लागते. जो बाकीच्या सर्वांबरोबर संपर्क साधेल, बैठक बोलवेल त्यासाठी कोणाची तरी नियुक्ती करावीच लागते. त्याप्रमाणे त्यांनी ती केली आहे.

शिवसेनेसह काँग्रेस आमदार नॉट रिचेबल?

शिवसेनेप्रमाणे काँग्रेसचे आमदार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देत भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादीचे पण सगळे आमदार रिचेबल आहेत, काँग्रेसचे पण सर्व आमदार रिचेबल आहेत. शिवसेनेचे अर्धे रिचेबल आहे आणि आता जे अन रिचेबल आहेत ते हळूहळू रिचेबल होतील. यात अपक्ष आहेत, लहान लहान पक्ष आहेत त्यामुळे अनेक वेळा एखाद्या पक्षाचा उमेदवार राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुक पडतो, दुसरा निवडणुन येतो, म्हणून काही अशाप्रकारे भूकंपासारख्या गोष्टी घडत नाहीत. सरकारला कधी धोका निर्माण होतो असं कधी झालेलं नाही.


एकनाथ शिंदेचे मन वळवण्यासाठी शिवसेनेचे चाणक्य सूरतमध्ये