घरताज्या घडामोडी'ज्याला घ्यायची आहे, तो कुठेही जाऊन घेणार', वाईन विक्रीवर छगन भुजबळांचे मोठं...

‘ज्याला घ्यायची आहे, तो कुठेही जाऊन घेणार’, वाईन विक्रीवर छगन भुजबळांचे मोठं विधान

Subscribe

ज्याला घ्यायची आहे, तो कुठेही जाऊन घेणारच आहे. उगीच साप साप म्हणून भुई थोपटण्याचे काम आहे. उगच काहीतरी विषय काढून त्यांच्यावर आंदोलन करायचे हे बरोबर नाही असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

महाविकास आघाडी सरकारने राज्यात सुपरमार्केटमध्ये वाईन विकण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. वाईन विकण्याच्या परवानगीवर भाजप आणि इतर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येत असताना महाविकास आघाडीमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारच्या वाईन विक्री करण्याच्या निर्णयाचे समर्थन केल आहे. ज्याला घ्यायची आहे तो कुठेही जाऊन घेणारच आहे असे विधान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना वाईन विक्रीचे समर्थन केलं आहे. भुजबळांनी भाजपवर निशाणा साधत असताना म्हटलं आहे की, मध्य प्रदेशात भाजप सरकारने मोठ्या प्रमाणावर मद्य साठवण्याची परवानगी दिली आहे. तसेच बारसुद्धा उघडण्याची परवानगी दिली असल्याचे भुजबळांनी सांगितले आहे.

- Advertisement -

दरम्यान छगन भुजबळ पुढे म्हणाले की, अख्ख्या जगाने वाईनला हेल्थ फूड म्हणून मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. ज्याला घ्यायची आहे, तो कुठेही जाऊन घेणारच आहे. उगीच साप साप म्हणून भुई थोपटण्याचे काम आहे. उगच काहीतरी विषय काढून त्यांच्यावर आंदोलन करायचे हे बरोबर नाही असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

सोमय्या आणि संजय राऊतांमध्ये वाद

शिवसेना खासदार संजय राऊत यांची वाईन उद्योगात गुंतवणूक असल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमची वायनरीमध्ये गुंतवणूक असेल तर ती किरीट सोमय्यांनी त्यांच्या नावे घ्यावी आणि चालवावी. तसेच सोमय्यांनी उद्योगपती गर्ग यांच्याशी संजय राऊतांनी करार केला असल्याचा आरोप केला होता. यावर राऊत म्हणाले की, उद्योगपती अशोक गर्ग माझे मित्र आहेत. एखाद्या कंपनीत संचालक असणं यामध्ये गुन्हा काय आहे? किरीट सोमय्यांचा मुलगा चणे शेंगदाणे विकतो का? भाजप नेत्याची मुलं केळी विकतात का? अमित शाहांचा मुलगा केळी, सफरचंद, ढोकळा विकतो का? कुणाची मुले काय विकतात हा व्यक्तिगत प्रश्न असल्याचे राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : आमची वायनरी असेल तर सोमय्यांनी ताब्यात घ्यावी, शहांचा मुलगा ढोकळा विकतो का?, संजय राऊतांचा पलटवार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -