घरमहाराष्ट्रChhagan Bhujbal : राष्ट्रवादीतील 'दीवार' भक्कम; एकमेकांकडे काय आहे, याची भुजबळांनी दिली...

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीतील ‘दीवार’ भक्कम; एकमेकांकडे काय आहे, याची भुजबळांनी दिली जंत्री

Subscribe

मुंबई : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ अजित पवार गटाला देऊ केले आहे. ज्यामुळे ज्या शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन करण्याचे आणि वाढवण्याचे काम केले, त्यांच्या हातातूनच ती राष्ट्रवादी निसटली आहे. पण निवडणूक आयोगाने शरद पवार यांना “राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार” हे नाव दिले आहे. परंतु, यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यात येत आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाकडून गटाला नवे नाव मिळताच एक विधान केले, त्यांच्या त्या विधानाला मंत्री छगन भुजबळ यांनी दीवार चित्रपटाच्या एका डायलॉगमधून प्रत्युत्तर दिले आहे. (Chhagan Bhujbal reply to Rohit Pawar statement with a dialogue from the film Deewar)

हेही वाचा… Bhujbal : सत्ता डोक्यात गेली की शब्द बदलतातच…, शरद पवार गटाचा भुजबळांवर निशाणा

- Advertisement -

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव अजित पवार गटाला दिल्यानंतर आता त्यांना शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नवे नावही मिळाले आहे. याबाबत बोलताना रोहित पवार काल म्हणाले की, “तुम्ही पक्ष चोरलात, चिन्ह चोरलेत तरीही बापमाणूस आमच्याकडे आहे. ते म्हणजे शरद पवार.” त्यांच्या या वक्तव्याबाबत आज (ता. 08 फेब्रुवारी) प्रसार माध्यमांनी छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, मला एक सिनेमा आठवतो. आता जर समजा अमिताभ बच्चन आणि शशी कपूर इथे असते. तर अमिताभ बच्चन म्हणाले असते तुम्हारे पास क्या है? हमारे पास गाडीयाँ है, मंत्री है, हमारे पास सरकार है, सत्ता है, हमारे पास पार्टी है, हमारे पास चिन्ह है, तुम्हारे पास क्या है? तर शशी कपूर म्हणाले असते हमारे पास शरद पवार है, असे म्हणत भुजबळांनी रोहित पवारांच्या विधानाला उपहासात्मक टोला लगावला.

तर, यातली गंमत समजून घ्या. रोहित पवार म्हणत आहेत की तुम्ही सगळं घेतलंत आमच्याकडे शरद पवार आहेत म्हणून मी हे म्हणत आहे, असेही स्पष्टीकरण दिले आहे. पण आता रोहित पवारांच्या विधानाला छगन भुजबळ यांनी फिल्मी स्टाइल उत्तर दिल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे. पण छगन भुजबळ यांच्यामुळे आज पुन्हा एकदा दीवार सिनेमातील ‘त्या’ अजरामर अशा प्रसंगाची पुन्हा एकदा आठवण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -