घरमहाराष्ट्रChhagan Bhujbal : "राजीनामा मंजूर होत नाही...", छगन भुजबळांचे सूचक विधान

Chhagan Bhujbal : “राजीनामा मंजूर होत नाही…”, छगन भुजबळांचे सूचक विधान

Subscribe

आता महाराष्ट्रचे देखील बजेट येईल, त्यातून आरक्षण घ्या", असा टोलाही काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना लगावला.

मुंबई : ‘जोपर्यंत राजीनामा मंजूर होत नाही. तोपर्यंत मला मंत्री म्हणून काम करावे लागेल’, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. 16 नोव्हेंबरला मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे, असा गौप्यस्फोट स्वत: छगन भुजबळांनी नगर येथील ओबीसींच्या एल्गार परिषदेत केला आहे. मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचे आणि काढायचे हा अधिकार राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे असतो, असेही वक्तव्य छगन भुजबळांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राजीनाम्यावर छगन भुजबळ म्हणाले, “जोपर्यंत राजीनामा मंजूर होत नाही. तोपर्यंत मला मंत्री म्हणून काम करावे लागेल. फाईलवर सही करावी लागेल. सरकारी लाभ म्हणजे तरी काय लाभ असतात. मी माझ्या गाडीतून फिरतोय आणि कार्यकर्त्यांच्या खर्चातून सभा होत आहेत आणखी कसला लाभ आहे माझ्याकडे”, असे ते म्हणाले.

- Advertisement -

मंत्रिमंडळात कुणाला ठेवायचे आणि काढायचे मुख्यमंत्री ठरवतात

राजीनामा राज्यपालांकडे द्यावा लागतो, यावर छगन भुजबळ म्हणाले, “राज्यपालांकडे कसा द्यावा लागेल, मंत्री कोण करते, त्यांना नावे कोण कळविते, तर ते मुख्यमंत्री कळवितात. कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते आहे, हे कोण ठरविते, तर ते मुख्यमंत्री ठरवून त्यांना कळवितात. मंत्रिमंडळ कोणाचे असावे, कोण मंत्रिमंडळात असावे हे सर्व मुख्यमंत्री ठरवितात आणि मंत्रिमंडळातून कोणाला काढायचे हे देखील मुख्यमंत्री ठरवितात. त्याप्रमाणे मुख्यमंत्री राज्यपालांना कळवितात.”

हेही वाचा – Raut On Bhujbal : “भुजबळांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार…”, संजय राऊतांची मुख्यमंत्री आणि फडणवीसांवर टीका

- Advertisement -

राज्याच्या बजेटमधून आरक्षण घ्या

तुम्ही राजीनामा देण्याचे नाटक करत आहात, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले, यावर छगन भुजबळ प्रतिक्रिया देत म्हणाले, “कोणकाही म्हणते, त्यांना बजेटमधून आरक्षण हवे आहे. आता महाराष्ट्रचे देखील बजेट येईल, त्यातून आरक्षण घ्या”, असा टोलाही छगन भुजबळांनी मनोज जरांगेला लगावला.

हेही वाचा – Uddhav Thackeray : गद्दारांच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार- उद्धव ठाकरे

लोकशाहीने सर्वांनाच मतप्रदर्शन करण्याचा अधिकार दिला

सरकारमधील मंत्री वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत, या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले, “एखाद्या गोष्टीवर मतप्रदर्शन करण्याचा अधिकार लोकशाहीने सर्वांच दिलेला आहे. विरोधी पक्षांना दिलाय तसा आम्हाला सुद्धा दिलेला आहे. एखादी गोष्ट पटत नसेल, तर आम्ही बोलतो.”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -