Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रChhagan Bhujbal : "फडणवीसांनी खूप अवहेलना सहन केली, पण...", 'CM'पदाच्या चर्चेवर भुजबळांनी...

Chhagan Bhujbal : “फडणवीसांनी खूप अवहेलना सहन केली, पण…”, ‘CM’पदाच्या चर्चेवर भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

Subscribe

Chhagan Bhujbal News : भुजबळ म्हणतात, मला किमान एक लाखांचं मताधिक्य मिळालं पाहिजे होते. पण, मताधिक्य कमी झालं, कारण...

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, फडणवीसच मुख्यमंत्री होणार का? याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात साशंकता आहे. पण, फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) ज्येष्ठ नेते, छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

जातीय समीकरणानुसार मुख्यमंत्री ठरवला जाणार आहे का? असा प्रश्न विचारल्यावर छगन भुजबळ म्हणाले, “असं काहाही होणार नाही. 132 आमदार निवडून आल्यानं भाजपचाच मुख्यमंत्री होणार, हे स्पष्ट आहे. त्यात आक्षेप घेण्यासारखं काहीही नाही.”

- Advertisement -

हेही वाचा : “बारामती लढली नसती, तर वेगळा संदेश गेला असता”, शरद पवारांच्या विधानावर अजितदादा म्हणाले, “माझ्या भावाच्या…”

“शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांनी सरकारबाहेर राहून काम करणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु, दिल्लीवरून आदेश आल्यानंतर फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणून काम करावे लागले. फडणवीसांनी पक्षाचा आदेश म्हणून अवहेलना सहन केली. नंतर पूर्णपणे 100 टक्के कामाला झोकून दिलं. महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यासाठी फडणवीसांनी काम केले. त्यामुळे बाकीचे प्रश्न निर्माण होत नाहीत,” असं म्हणत फडणवीसच मुख्यमंत्री असतील, असं भुजबळांनी म्हटलं.

- Advertisement -

हेही वाचा : “10 मिनिटांत यांना आमदार केलं, मात्र आता फडणवीसांचा हा पठ्ठ्या…”, राम सातपुतेंचा रणजितदादांना इशारा

“‘ईव्हीएम’वर काहीजण संशय घेतात. पण, मला किमान एक लाखांचं मताधिक्य मिळालं पाहिजे होते. मनोज जरांगे-पाटील आणि काहीजण माझ्या मतदारसंघात फिरत राहिले. त्यामुळे माझं मताधिक्य कमी झालं. 2700 हजारांचं मताधिक्य मिळालं. कारण, जरांगेंच्या आवाहनानंतर एका मोठ्या वर्गाची मते मिळाली नाहीत. ‘ईव्हीएम’मध्ये गडबड होती, तर मला एक लाख मते मिळाली पाहिजे होती. माझी मते का कमी झाली?” असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -