घरताज्या घडामोडीधान खरेदीबाबत आलेल्या सूचनांवर काटेकोरपणे कार्यवाही करा, छगन भुजबळ यांचे निर्देश

धान खरेदीबाबत आलेल्या सूचनांवर काटेकोरपणे कार्यवाही करा, छगन भुजबळ यांचे निर्देश

Subscribe

धान खरेदी करताना शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येवू नयेत, धान विहित वेळेतच खरेदी केले जावे याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी. शेतकऱ्यांकडून धान खरेदीबाबत आलेल्या सूचनांबाबत योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले, धान खरेदी करताना शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येवू नयेत. तसेच धान विहित वेळेतच खरेदी केले जावे याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातून धान खरेदीबाबत काही सूचना आहेत त्याबाबत सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. बारदान खरेदीसाठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्यात यावे. धान खरेदी करताना तपासण्यात येणारे निकषामुळे जर काही अडचण निर्माण होत असल्यास वरिष्ठ कार्यालयांकडून क्षेत्रीय कार्यालयांनी तत्काळ मार्गदर्शन घ्यावे मात्र धान खरेदी ही वेळेतच केली जावी अशा सूचनाही भुजबळ यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -

बाजार समित्यांनी खरेदी केलेल्या बारदानाचा निधी विहित वेळेत दिला जावा,धान खरेदीबाबत गुणवत्ता तसेच संनियत्रण योग्य पध्दतीने करताना समित्या तसेच शेतकरी यांना अडचण होवू नये याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी अशा वेगवेगळया सूचना छगन भुजबळ यांनी केल्या आहेत.

- Advertisement -

धान खरेदी वेळेत केली जावी – प्रफुल्ल पटेल

नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात धान खरेदी वेळेत केली जावी. धान साठवणुकीसाठी गोदामांची आवश्यकता आहे. राज्य शासनामार्फत आवश्यक त्या ठिकाणी गोदाम बांधण्यात यावेत. अशा मागण्या यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केल्या आहेत.


हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांची ऐतिहासिक पगारवाढ, संप मात्र कायम ; गुरूवारी होणार निर्णय


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -