गोपीनाथ मुंडे असते तर….. छगन भुजबळांनी व्यक्त केल्या भावना

Chhagan Bhujbal

नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथ गड या स्मारकाचे आणि त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी जनतेला संबोधित केलं.तसेच स्व. गोपीनाथ मुंडेंच्या कार्याबाबत सांगताना त्यांनी अनेक भावना व्यक्त केल्या.

गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांचं अकाली जाणं हे आपल्यासाठी मोठा धक्का आहे. ज्यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांचे वडील माझे मोठे भाऊ मगण भुजबळ यांचं दुःखद निधन झालं. त्यावेळी मला अतिशय दुःख झालं होतं. त्यानंतर माझे धाकटे भाऊ गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर माझा धाकटा भाऊही गेल्याने मला अतिशय तीव्र असं दुःख झालं, अशी भावना छगन भुजबळांनी व्यक्त केली.

गोपीनाथ मुंडे असते तर माझे अडीच वर्ष जेलमध्ये गेले नसते. पहाडासारखा हा माझा धाकटा भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असता. महाराष्ट्रातील गोर गरीब जनतेसाठी हा नेता आजही आपल्यात पाहिजे होता, असं छगन भुजबळ म्हणाले.

त्यांनी आपलं आयुष्य सर्व सामान्य जनतेसाठी आणि कष्टकरी ऊसतोड कामगारांच्या हितासाठी अर्पण केलं. राज्यात माधव हा गट उभा करण्यात गोपीनाथ मुंडे यांनी मोलाचं योगदान दिलं. ओबीसी चळवळीसाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. राज्यातील गोर गरीब मागासवर्गीय जनतेचे सेवा करण्याचं काम त्यांनी केलं. ते काम तुम्हाला आम्हाला पुढे न्यायचे आहे. त्यांचा वारसा आणि त्यांचं काम पंकजा मुंडे अतिशय प्रभावीपणे पुढे नेत असल्याचे भुजबळांनी सांगितले.


हेही वाचा : गोपीनाथ मुंडे हे शिवसेना आणि भाजप युतीचे शिल्पकार – मुख्यमंत्री एकनाथ