घरमहाराष्ट्रघाबरले असाल तर ताबडतोब भाजपामध्ये जायचं, तपास यंत्रणांच्या कारवाईवरून भुजबळांचा भाजपावर हल्लाबोल

घाबरले असाल तर ताबडतोब भाजपामध्ये जायचं, तपास यंत्रणांच्या कारवाईवरून भुजबळांचा भाजपावर हल्लाबोल

Subscribe

राज्याचे अन्न आमि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आज ओबीसी हक्क परिषदेत भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर टीका आहे. यावेळी ईडी, सीबीआय, आयकर विभाग या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून त्यांनी भाजपावर तुफान टोलेबाजी केली आहे. ”घाबरले असाल तर ताबडतोब भाजपामध्ये जा, म्हणजे सर्व गुन्हे माफ होतील’ असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे.

ओबीसी आरक्षण का काढलं ? हे आधी सांगा आणि त्याची भरपाई कशी करणार याची माहिती द्या, Mरद पवार साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं, देशात सर्वत्र आरक्षण होतं, पण १०२ वी घटना दुरुस्ती करताना केंद्र सरकारने ते काढलं. मग परत त्यांनी राज्यांना अधिकार दिले, पण आधी तुम्ही आरक्षण काढलं का हे सांगा, असा सवाल त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

- Advertisement -

इथे सगळे जण अनेक मुद्दयांवर जोरजोरात बोलले, चर्चा केली, पण सर्वांनी सावध राहा उद्या इन्कम टॅक्स घरी नाही आला म्हणजे झालं. घाबरले असाल त्यांनी भाजपामध्ये जा. म्हणजे सर्व गुन्हे माफ होतील. असा टोला त्यांनी लगावला आहे. जो जो या कामात येईल, त्यांच्या मागे इन्कम टॅक्स, ईडी लावली जाते, जसे एकनाथ खडसे साहेबांच्या मागे लागले. असं भुजबळ यावेळी म्हणाले.

देशात साडेसात हजार जाती आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना एकत्र आणले. खुला, ओबीसी, दलित, आदिवासी अशा ४ प्रवर्गात विभागले. सगळे एकत्र आलात तर आपली ताकद दिसेल. उत्तर भारतात ही ताकद दाखवली म्हणून त्यांना हक्क मिळाला. आपल्याला अशी ताकद दाखवावी लागणार आहे. असे आवाहन त्यांनी ओबीसी वर्गाला केले आहे.

- Advertisement -

अनेक ओबीसी मंत्री मात्र बोलणारे थोडे

यावेळी छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्षरित्या ओबीसी मंत्र्यावर निशाणा साधला आहे. आत्ता हे गुलाबराव पाटील मंत्रिमंडळात देखील ते माझ्या पाठीशी ओबीसी मुद्द्यांवर बोलत बोलतात, त्याबद्दल त्यांचे आभार मानले. ओबीसी मंत्री देखील खूप आहेत, मी कुणावर वैयक्तिक टीका करणार नाही, पण यावर बोलणारे थोडे फार थोडे मंत्री आहेते असाही टोका भुजबळांनी लगावला आहे.

यावेळी भुजबळांनी तुरुंगातील दिवसांच्या आठवणी ताज्या केल्या. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, कपिल पाटील यांनी तुरुंगात असताना माझा जीव वाचवला. माझी तब्येत बरी नसताना त्यांनी खूप मदत केली. ते विधानमंडळात उभे राहिले, आवाज उठवला. या माणसाचा शब्द मी मोडू शकत नाही. शरद पवारांनी देखील मला साथ दिली. त्यांनीही पत्र पाठवले होते. त्यामुळे मला उपचार मिळाले. असंही भुजबळ म्हणाले. सरकारकडून अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात आहेत. धर्मांची अफूची गोळी आज सर्वांवर राज्य करत आहे. मंडल बाहेर आले की लगेच कमंडल बाहेर येते, असं छगन भुजबळ म्हणाले.

धर्माची अफूची गोळी राज्य करतेय

छगन भुजबळांनी अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा उल्लेख करत पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर हजारो महिली अथर्वशीर्ष पठण करत असल्याचा उल्लेख केला. “दगडूशेठ हलवाई गणपतीला हजारो भगिनी अथर्वशीर्ष म्हणत असतात. त्या जागेपासून जवळच सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी सुरू केलेली पहिली शाळा आहे. पण तिथे एकही महिला फिरतक नाही. एकाही भगिनीला वाटत नाही तिथे जाऊन डोकं टेकावं. त्यांनी शिकवलं म्हणून अथर्वशीर्ष वाचू शकलात. प्रचंड अंधश्रद्धा आणि ती धर्माच्या अफूची गोळी आज सगळ्यांवर राज्य करतेय”, असं भुजबळ म्हणाले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -