Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत - छगन भुजबळ

जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत – छगन भुजबळ

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोमवारी ईडी कार्यालयात हजर झाले होते. यावेळी ईडीकडून त्यांची तब्बल साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर आणि चौकशीला हजर होण्यापूर्वी राष्ट्रवादी आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी त्यांना फोन केला होता. परंतु विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जयंत पाटलांना एकही फोन केलेला नव्हता. त्यामुळे पक्षातच मतभेद असल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान, जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, जयंत पाटील हे पूर्णपणे निर्दोष असून ते याप्रकरणातून बाहेर येतील. त्यामुळे मी जरी फोन केला नसला तरी मी जयंत पाटील यांच्यासोबत आहे. तसेच अजित पवारांच्या बाबतीत देखील आहे. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. राष्ट्रवादीच्या कामानिमित्त त्यांच्यासोबत भेट होतच राहते.

- Advertisement -

महाविकास आघाडीत सर्वच भाऊ आहेत. आता मोठा कोण आणि छोटा कोण? हे कशावरून ठरवायचं. मला या सर्व भावांच्या कार्यकर्त्यांना सांगायचंय की याबाबत तिन्ही भावांचे प्रतिनिधी एकत्रित बसणार आहेत आणि कोण कुठून लढवणार हे सुद्धा ठरणार आहे. यामध्ये कोणाला दोन-तीन जार जास्त तर कुणाला काही जागा कमी मिळतील. महाविकास आघाडी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत दैदीप्यमान असं यश मिळवल्याशिवाय राहणार नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.

त्यावर भाष्य करण्यासाठी मी काही खासदार नाही. जुन्या संसद भवनाचं स्थान अतिशय चांगल्या मनानं मनात कोरलं गेलं आहे. आता हे नवीन संसद भवन उभारण्यात आलं आहे. संसद भवन हे देशातील प्रमुख निर्णय घेणारं भवन आहे. त्याचप्रमाणे देशाचे राष्ट्रपती हे देशातील पहिल्या क्रमांकाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या हातातून उद्घाटन व्हायला पाहिजे. हे म्हणणं अतिशय योग्य आहे. कारण राष्ट्रपती हा सर्वांचा असतो. पंतप्रधानांना पक्षाचं लेबल लागतं, असं भुजबळ म्हणाले.


- Advertisement -

हेही वाचा : Konkan Railway Train Booking: गाड्यांची बुकिंग फुल्ल झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी घेतली दखल, नितेश राणेंची


 

- Advertisment -