घरताज्या घडामोडीउपमुख्यमंत्र्यांनंतर छगन भुजबळांना कोरोनाची लागण

उपमुख्यमंत्र्यांनंतर छगन भुजबळांना कोरोनाची लागण

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असं ट्विट छगन भुजबळ यांनी केलं आहे.

- Advertisement -

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाची मालिका सुरूच आहे. यापूर्वी देखील राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, भगतसिंह कोश्यारी यांना कालच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे. तसेच बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -