घरमहाराष्ट्रOBC Rally : 'गाढवाला पाण्याच्या टाकीवर चढवलं कोणी?' जरांगेंचा नामोल्लेख टाळून भुजबळांनी...

OBC Rally : ‘गाढवाला पाण्याच्या टाकीवर चढवलं कोणी?’ जरांगेंचा नामोल्लेख टाळून भुजबळांनी मारले एका दगडात दोन पक्षी

Subscribe

इंदापूर : राज्यात सध्या ओबीसी विरूद्ध मराठा असा वाद सुरू आहे. मराठ्यांना ओबीसीतून सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. तर त्यांच्या या मागणीला ओबीसी नेते आणि सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी थेट विरोध करत यासाठी ओबीसी बचाव मोहीम सुरू केली. राज्यातील विविध भागांत ओबीसी बचाव महाएल्गार सभेचे आयोजन छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. ज्यामुळे भुजबळ विरूद्ध जरांगे पाटील असा नवा वाद देखील राज्यात सुरू झाला आहे. ओबीसी एल्गारचा आजचा मेळावा हा पुण्यातील इंदापूर येथे होत आहे. या सभेतून ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.

भुजबळ यांनी गाढवाचं उदाहरण देत म्हणाले की, आपल्या गावात पाण्याची टाकी असेत. ती पाच-सहा माळ्याच्या इमारतीएवढी उंच असेत. एक दिवशी सकाळी काही तरूण पोरं पाण्याच्या टाकीखाली जमेल आणि त्यांची चर्चा सुरू झाली. तेव्हा एका वयस्कर म्हाताबुवा पाटील आले आणि म्हणाले काय रे पोरांनो काय झालं कशाला जमली? तेव्हा पोरं त्यांना म्हणाली अहो काय करायचं ते बघा टाकीवर गावढ चढलं आहे. त्याला खाली कसं आणायचं याची चर्चा करतोय आम्ही. त्यावर पाटील म्हणाले त्या गाढवाला खाली कसं आणायंच ते आपण बघू, पण त्याला एवढ्या उंचीवर घेऊन गेलं कोण? आता सगळे डोक्याला हात लावून बसले याला कसं खाली काढायच? अरे याला तुम्ही वरती नेलं तेव्हा काही बोलला नाहीत आता डोक्याला होत लावून बसले.

- Advertisement -

हेही वाचा… Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचा हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहितेंना सवाल, ‘सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले तर…’

जरांगे पाटील यांच्यावर टिका करताना भुजबळ म्हणाले की, हा मला काय म्हणतो येवल्याचं येडपट, म्हणजे मी येडपट. आता बघा 1985 मध्ये त्याचा जन्म झाला होता? माहिती नाही. त्यावेळेला मी मुंबईचा महापौर होतो, आणि दोन वेळी आमदार झालो. एक नाही तर दोन पदं भुषवली. मी देशाच्या महापौरांचा अध्यक्षही झालो. अरे तू आधी ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव. लोकांनी याला उगाच महत्त्व दिलं आहे, याच्या डोक्यात हवा गेली आहे. अशी ऐकेरी शब्दात भुजबळांनी टिका केली आहे.

- Advertisement -

गावबंदी बाबत बोलताना भुजबल म्हणाले की, सध्या चाललंय गावबंदी. काय गावबंदी ? मी कुठेही गेलो ना की गावबंदी. घनसावंगी गावात गेलो तिथे दोन फ्लेक्स होते. एक मराठा आरक्षण गावबंदी कुणीही यायचं नाही. त्याच्या शेजारीच दुसरा बोर्ड आहे आमदार रोहित पवार आणि त्यांच्या यात्रेचं हार्दिक स्वागत. बाकीच्यांना गावबंदी यांचं स्वागत. त्यानंतर ते गावात गेले त्यानंतर भाषण वगैरे केले. एका पोराने गावबंदीवर प्रश्न विचारले त्याला खाली बसवलं. दुसऱ्या दिवशी तो पोरगा हॉस्पिटलमध्ये होता कारण त्याला मारझोड करण्यात आली. मी मागेही पोलिसांना सांगितलं की गावबंदीचे बोर्ड काढून टाका. घटनेनुसार कुणीही कुठल्या गावात जाऊ शकतो. गावबंदीचे बोर्ड काढले जात नाहीत. ठराविक लोकांना गावात प्रवेश दिला जातो. त्यांना प्रश्न विचारला गेला तर मारहाण होते आहे. घाणेरडे मेसेज केले जात आहेत. रुपाली चाकणकर यांनाही घाणेरडे मेसेज पाठवले जात आहेत. ते काहीही करत आहेत त्यांना सगळी मुभा आहे असाही आरोप छगन भुजबळ यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -