Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र 'सत्य परेशान हो सकता है लेकीन...', महाराष्ट्र सदनप्रकरणी दोषमुक्त झाल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया

‘सत्य परेशान हो सकता है लेकीन…’, महाराष्ट्र सदनप्रकरणी दोषमुक्त झाल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात दिलासा मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं असं म्हटलं. छगन भुजबळ आज शायराना अंदाजात दिसले. तसंच, त्यांनी या सगळ्या प्रकरणानंतर आता आमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नाही… कोणावरही लोभ नाही, असं स्पष्ट केलं.

तरी देखील आमच्यावर आरोप

महाराष्ट्र सदन प्रकरण भारतात नव्हे तर जगात गाजलं. महाराष्ट्र सदन फाईव्ह स्टार हॉटेलसारखं बांधण्यात आलं. देशातील अनेक राजकीय पक्ष त्याचा वापर करत आहेत. मंत्रिमंडळाने ठरवल्या प्रमाणे अधंरीतील आरटीओ ऑफिस, हायमाऊंट गेस्ट हाऊसचं काम केलं. महाराष्ट्र सदनाचा वापर ८ वर्ष करतायत. कंत्राटदाराला १०० कोटी रुपयांचा एफएसआय देऊ असं सांगण्यात आलं होतं. मात्र, आजपर्यंत त्याला एक फूट देखील एफएसआय मिळालेला नाही, एक फूट जमीन, एक रुपया देखील त्याला मिळालेला नाही. तरी देखील आमच्या वर ८०० कोटींच्या भ्रष्टाचारांचा आरोप आमच्यावर केले, असं छगन भुजबळ म्हणाले.

- Advertisement -

आमच्याविरोधात जोरात मीडिया ट्रायल झाली. ईडीची केस देखील झाली. शेवटी मला आणि समीरला दोन वर्षांहून जास्त काळ तुरुंगात रहावं लागलं. आता सत्र न्यायालात वर्षभर काम सुरु होतं. विधिज्ञांचा सल्ला घेत या प्रकरणातून आम्हाला वगळण्यात यावं यासाठी अर्ज केला. त्यानुसार मला, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ आणि इतर जणांना यातून निर्दोष वगळण्यात आलं, असं भुजबळ म्हणाले.

ईडीची कारवाई निरर्थक

महाराष्ट्र सदनमधून ८०० कोटी रुपये मिळाले यावरुन ईडीने कारवाई केली. मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केल्यानं ईडीच्या गुन्ह्यालाही काही अर्थ उरत नाही. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून काळा पैसा मिळवल्याचा ईडीचा आरोप निर्थक आहे, असं भुजबळ म्हणाले.

साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए पर…

- Advertisement -

साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए…ये जनता की दुवाएँ है, उन्हे मुक्कमल नहीं होने देती….अशी शेरेबाजी करत भुजबळांचा पुन्हा एकदा शायराना अंदाज दिसून आला. “तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे…त्यांनी कितीही कटकारस्थान केलं तरी थोटामोठ्यांच्या आशीर्वादामुळे आमच्यावरचं विघ्न दूर झालं…पवारसाहेबांचे आभार…जयंतराव-अजितदादांचे आभार…मला मंत्रिमंडळात घेतलं, उद्धवजींचेही आभार, कठीण काळात माझ्यामागे आणि कुटुंबामागे उभे राहिलेल्या प्रत्येकाचे आभार भुजबळ यांनी मानले.

सर्वप्रथम पवारांना भेटण्यासाठी धाव घेतली

न्यायालयाच्या निर्णयानंतर ताबडतोब पवारांना सांगणं अपेक्षित होतं, मुख्यमंत्री हे माझ्या मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत, त्यांनीही आनंद व्यक्त केलं. आज समाधानाची बाब आहे, पण काही लोक मला झोपू देणार नाहीत हे मला माहिती आहे पण कितीही प्रयत्न केले तरी मी शांत झोपणार आहे, असं भुजबळ म्हणाले.

ज्यांना कुठे जायचं तिथे जा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना ज्यांना कुठे जायचं तिथे जाऊद्या, लोकशाहीमध्ये अधिकार आहे. सत्र न्यायालयाने सर्व आरोपांचा अभ्यास करुन दोषमुक्त केलं आहे. न्यायदेवतेवर आमचा गाढा विश्वास आहे. वेळ लागेल पण न्यायदेवता आम्हाला न्याय देईल. सगळ्या खटल्यांना आम्ही तोंड देऊ, असं भुजबल म्हणाले.

तुरुंगात जावं लागल्याचं दुख आहे पण…

तुरुंगात जावं लागल्याचं दु:ख आहे पण किती वेळ दु:ख उगाळत बसायचं… दरम्यानच्या काळात मला, माझ्या कुटुंबाला, छोट्या लेकरांना खूप त्रास झाला पण आपल्या सगळ्यांचं किती आयुष्य आहे… कशाचा कुणाचा द्वेष करायचा… म्हणून माझ्या मनात कुणाबद्द्ही द्वेष नाही… राग नाही, असं भुजबळ म्हणाले.

आमचं सरकार असल्यामुळे सुटका झाली, असं नाही तर…

आमचं सरकार असल्यामुळे माझी सुटका झाली असं नाही तर माझ्या वकिलांनी माझी न्यायालयात तगडी बाजू मांडली… माझा न्यायदेवतेवर विश्वास होता… अखेर न्यायदेवतेने निर्णय दिला… माझ्यासाठी हा मोठा दिलासा असणार आहे, असं भुजबळ म्हणाले.


हेही वाचा – छगन भुजबळांना मोठा दिलासा, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सर्व आरोपातून मुक्तता!


 

- Advertisement -